ढेबेवाडीत मगर बंधू ज्वेलर्समध्ये चोरी; नऊ तोळे सोने लंपास!

भरदिवसा घडलेल्या घटनेने व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण; चोरट्यांचा बंदोबस्त करून वारंवार घडणाऱ्या घटनांना आळा घालण्याची ग्रामस्थांची मागणी

ढेबेवाड : पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथील मगर बंधू ज्वेलर्स या सराफ दुकानात आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास चोरीची घटना घडली. अज्ञात व्यक्तींनी दुकानातून सुमारे नऊ तोळे सोने चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

ढेबेवाडी विभागात चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. व्यापारी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी अशा घटनांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

या घटनेतील संशयित व्यक्तीचा तातडीने शोध घेऊन चोरीस गेलेले सोने हस्तगत करावे, संबंधित व्यक्तीला अटक करून कायदेशीर कारवाई करावी, तसेच ढेबेवाडी विभागातील संवेदनशील ठिकाणी पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

भरदिवसा सराफ दुकानात चोरीची घटना घडल्याने व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, ढेबेवाडी पोलीस प्रशासन या प्रकरणात काय कारवाई करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला