पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या गावातीलच ग्रामसभेत धक्काबुक्की
Satara News Team
- Tue 2nd Jan 2024 02:36 pm
- बातमी शेयर करा
मल्हारपेठ : पेयजल योजनेच्या कामावरून सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे गाव असलेल्या मरळीच्या ग्रामसभेत वादावादी, धक्काबुक्की झाली. या वादानंतर सरपंचांनी मल्हारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावरून दहा जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी घडली.
सरपंच कांचन संभाजी पाटील (रा. मरळी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून, प्रवीण लक्ष्मण पाटील, धनाजी लक्ष्मण पाटील, जितेंद्र साहेबराव पाटील, संदेश सयाजी पाटील, शुभम शरद पाटील, संग्राम भीमराव पाटील, संजय विजय सणस, अनिकेत उत्तम पाटील, संजय एकनाथ पाटील, राजेंद्र रामचंद्र पाटील यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायतीच्या नवीन कार्यालयात शनिवारी ग्रामसभेचे आयोजन केले होते. कांचन पाटील ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी उपसरपंच व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामसभेतील सर्व विषय संपल्यानंतर परवानगी न घेता ऐनवेळेच्या विषयावेळी माजी सरपंच प्रवीण लक्ष्मण पाटील यांनी पेयजल योजना सुरळीत चालत नसलेबाबतचा विषय मांडला. त्यावर माजी उपसरपंच कृष्णा कदम यांनी पेयजल योजनेचे काम केलेले ठेकेदार यांना बोलावून कामाची चौकशी करू, असे ग्रामसभेमध्ये उत्तर दिले.
त्यावेळी प्रवीण पाटील यांनी तुम्ही पाच वर्षे काय केले? असे म्हणत शिवीगाळ करू लागले. सरपंच त्यांना शांत राहणेबाबत सांगत होते. तरी त्यांनी काही न ऐकता प्रवीण पाटील व धनाजी पाटील यांनी कृष्णा कदम यांना तसेच संभाजी पाटील हे भांडणे सोडवायला गेले असता त्यांना अनिकेत पाटील, शुभम पाटील, संग्राम पाटील, संजय सणस यांनी धक्काबुक्की केली. तर विलास कदम यांना संजय पाटील यांनी श्रीमुखात लागावली. तसेच कृष्णा कदम यांच्या अंगावर राजेंद्र पाटील हे मारण्यासाठी धावून जात होते. प्रवीण पाटील व धनाजी पाटील यांनी ग्रामसभा घेऊ नका, बंद करा. तुम्हाला गावची कामे करता येत नाहीत, असे म्हणत ग्रामसभा बंद पाडली.
पोलिस अधीक्षकांकडून घटनास्थळी पाहणी
पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे गाव असलेल्या मरळीतील ग्रामसभेत वाद झाल्याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सहायक पोलिस निरीक्षक उत्तम भापकर करत आहेत.
स्थानिक बातम्या
जगन्मित्र कार्यकर्ते नाना शालगर यांचे निधन
- Tue 2nd Jan 2024 02:36 pm
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Tue 2nd Jan 2024 02:36 pm
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Tue 2nd Jan 2024 02:36 pm
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Tue 2nd Jan 2024 02:36 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Tue 2nd Jan 2024 02:36 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 2nd Jan 2024 02:36 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 2nd Jan 2024 02:36 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Tue 2nd Jan 2024 02:36 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Tue 2nd Jan 2024 02:36 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Tue 2nd Jan 2024 02:36 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Tue 2nd Jan 2024 02:36 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Tue 2nd Jan 2024 02:36 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Tue 2nd Jan 2024 02:36 pm













