कराडात विमानतळाजवळ पोलिसांच्या गाडीला अपघात तीन पोलीस कर्मचारी जखमी

कराड : लोकसभा निवडणुकीचा पाटण (जि. सातारा) येथून बंदोबस्त संपवून परतत असताना कराड तालुक्यातील विमानतळाजवळ  आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात झाला. त्यामध्ये तासगाव तालुक्यातील तुरची येथील पोलीस ट्रेनिंग सेंटरमधील तीन पोलीस  कर्मचारी जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघातील पाटण विधानसभा मतदारसंघात चार दिवसांपासून संबंधित पोलीस कर्मचारी हे बंदोबस्तावर होते. लोकसभेचे काल मतदान संपल्यानंतर आज सकाळी खासगी ट्रॅव्हल्समधून ते 33 कर्मचारी तुरचीकडे रवाना होण्यासाठी निघाले होते.

त्यांची ट्रॅव्हल्स विमानतळाजवळील एका ढाब्याजवळ आली असता, आयशर टेम्पो आडवा आल्याने अपघात झाला. त्यामध्ये ट्रॅव्हलच्या पुढील बाजूस बसलेले तीन कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी कराडच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कराड पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर, कराड शहर पोलीस निरीक्षक के.एन. पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

आम्हाला जोडण्यासाठी
esataranews.com

स्थानिक बातम्या

आकृतीबंधाचा शासन निर्णय  दोन वर्षांपूर्वीच  निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

आकृतीबंधाचा शासन निर्णय दोन वर्षांपूर्वीच निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

शिक्षण प्रसारक संस्था  करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या  हस्ते संपन्न...

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या हस्ते संपन्न...

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त