ना, देवेंद्र फडणवीस, ना उध्दव ठाकरे, यंदा एकनाथ शिंदे करणार विठ्ठलाची शासकीय महापुजा

विठ्ठलाच्या शासकीय पुजेचा मान हा अनेक वर्षापासून मुख्यमंत्र्यांकडे आहे.आजपर्यंत सर्वाधिक वेळा हा शासकीय पुजेचा मान दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना मिळाला आहे.

सातारा न्यूज मुंबई :- राज्याच्या राजकारणात खुप मोठ्या प्रमाणात उलटफेर झाल्याचे बघायला मिळाले आहे.बुधवारी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.त्याआधी पंढरपुरच्या विठ्ठालाची शासकीय महापुजा कोण करणार? यामध्ये भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार खडांजगी बघायला मिळाली होती.

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी नेहमी सांगत होते की, काहीही झालं तरी यंदा आषाढी एकादशीला विठ्ठालाची महापुजा ही उद्धव ठाकरेचं करतील. तर देवेंद्र फडणवीस यांना तो मान यंदातरी मिळणार नाही, अशा पद्धतीचं देखील वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केलं होतं. त्यामुळे ना देवेंद्र फडणवीस ना, उद्धव ठाकरे आता शासकीय महापुजेचा मान हा एकनाथ शिंदे यांना मिळणार आहे.

येत्या 10 जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी केली जाणार असून त्यासाठी महाराष्ट्रातून वारकरी पायी प्रवास करून पंढरपुरमध्ये दाखल होत आहेत. विठ्ठलाच्या शासकीय पुजेचा मान हा अनेक वर्षापासून मुख्यमंत्र्यांकडे आहे.आजपर्यंत सर्वाधिक वेळा हा शासकीय पुजेचा मान दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना मिळाला आहे. मागील वर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांनी पुजा केली होती.

दरम्यान,राज्यात आता नवे सरकार स्थापन होणार असून शासकीय महापुजा ही एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. काल गुरुवार एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. येत्या दोन दिवसात बहुमत सिद्ध करण्यासाठी अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. तर रविवारी विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे.

" ना, देवेंद्र फडणवीस, ना उध्दव ठाकरे, यंदा एकनाथ शिंदे करणार विठ्ठलाची शासकीय महापुजा"

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला