आता तरी मदनदादा थोडे राजकारण करा:दादांच्या निर्णयाकडे लक्ष

संघटना कार्यकर्त्यांची आहे दादा तुम्हाला संघटनेसाठी लढावेचं लागेल:दादा समर्थक आक्रमक,

वाई: ज्यांच्याशी आम्ही वर्षानुवर्षे संघर्ष केला त्यांना विजयी करण्यासाठी आम्ही कदापिही काम करणार नाही. महायुती पक्षादेश आम्ही काही मानत नसून दादा,तुमच्याशिवाय आम्हाला कुणीही वाली नाही. दादा,तुम्ही लढा,तुमच्या विजयासाठी आम्ही जीवाच रान करू,अशा तीव्र भावना व्यक्त करून कार्यकर्त्यांनी मदन दादा भोसले यांच्यावर लढण्यासाठी दबाव आणला. 

 महायुतीची उमेदवारी विद्यमान आमदार मकरंद पाटील यांना जाहीर झाल्यावर उद्दिग्न होऊन कार्यकर्त्यांनी मदनदादांना साताऱ्यातील निवासस्थानी गाठले.मदन दादानी कार्यकर्त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

 आम्ही वर्षानुवर्षे ज्यांच्याशी संघर्ष केला,त्यांच्या विजयासाठी काम करणं आम्हाला कधीच पटणार नाही.महायुती,आघाडीचा धर्म त्यांनी कधी पाळला आहे का?ज्यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबाला खासदारकी,आमदारकी,इतर सत्ता मिळाली ते त्या नेत्यांचे होऊ शकले नाहीत, असे लोक महायुतीचा धर्म पाळल्यावर आपले कसे होतील? त्यांना त्यांच्याच कार्यकर्त्यांना न्याय देता येईना ते आपल्या कार्यकर्त्यांना काय न्याय देणार।असा खडा सवाल करून कार्यकर्त्यांनी दादा,महायुती वगैरे आम्हाला काही माहीत नाही, तुम्ही लढायच,त्या आमदारांना सगळी सत्ता त्यांच्या घरात पाहिजे त्यांना जमिनीवर आणायला आम्ही सक्षम।आहोत.दादा,तुम्हाला मैदानात उतरवावेच लागेल,आम्ही रक्ताचे पाणी करू पण।तुम्हाला निवडून आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. 

 तुम्ही तुतारीतून लढा अथवा अपक्ष लढा,तुम्ही म्हणाल ते धोरण अन तुम्ही बांधाल तेच आमचे तोरण.!आमचे तुमच्यावर प्रेम आहे,निष्ठा आहे, तुम्ही कसे लढत नाही हेच आम्ही बघतो,असा निर्वाणीचा इशाराही कार्यकर्त्यांनी दादांना दिला आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त