अल्पवयीन मुलीची छेड काढून विनयभंग ; पोलिसात तक्रार दाखल.

शिरवळ : अल्पवयीन मुलीची छेडछाड करून केला विनयभंग या प्रकरणी शिरवळ पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे . पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दि.१८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२:३० वा चे सुमारास इसम निलेश संजय जाधव याने वाईट हेतूने त्याचेकडील सुझुकी मोटार सायकल वरून पाठलाग करून तक्रारदार यांचे जवळ येताच त्याची मोटरसायकल हळू करून तक्रारदार याचे डाव्या हातास त्याचे उजवे हाताने स्पर्श करून तुझे माझेकडे लक्ष आहे का ? असे वाईट हेतूने बोलून तक्रारदार यांचे मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले, म्हणून निलेश जाधव यांच्या विरोधात भा.द.वि.स. कलम ३५४ (ड)(१)(१), बालकांचे लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८,१२ अंतर्गत शिरवळ पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अधिक तपास पो. उपनिरीक्षक शंकर पांगारे करीत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला