15 तोळ्याच्या दागिन्यांसह 8 लाख 80 हजाराचा मुद्देमाल शाहुपूरी पोलीसांकडून मूळ मालकास परत
Satara News Team
- Tue 13th Aug 2024 07:49 pm
- बातमी शेयर करा
सातारा : शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २६ मे रोजी झालेल्या घरफोडीत १५ तोळ्याचे दागिने आणि रोख रकमेसह ८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. पोलिसांनी २४ तासात छडा लावून घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला होता. कायदेशीर प्रक्रिया पार पाडून मूळ मालकास मुद्देमाल परत करण्यात आला.
शाहुपूरी पोलीस ठाणेत तक्रारदार राजकुमार रामचंद्र उधानी (रा. ११७/९० लोखंडे कॉलनी, शुक्रवार पेठ, सातारा) यांच्या घरामध्ये अज्ञात इसमाने घरफोडी करुन तक्रारदार यांचे घरातील १५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व ९६ हजार रुपये रोख रक्कम चोरी करुन नेल्याबाबत शाहुपूरी पोलीस ठाणेस गु.र.नं.२४२/२०२४ भादवि कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. सदरचा गुन्हा शाहुपूरी पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेने २४ तासात उघड करुन आरोपीस अटक केली होती.
सदर आरोपीकडून १५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व ९६ हजार रुपये रोख रक्कम असा एकुण ८ लाख ८० हजार ७५० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला होता. हस्तगत केलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम आज मंगळवारी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या हस्ते तक्रारदार राजकुमार रामचंद्र उधानी (रा. ११७/९० लोखंडे कॉलनी, शुक्रवार पेठ, सातारा) यांना परत करण्यात आली.
स्थानिक बातम्या
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Tue 13th Aug 2024 07:49 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Tue 13th Aug 2024 07:49 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Tue 13th Aug 2024 07:49 pm
नो रिअल ....हो! अगदी खरं आहे. रील च्या चक्कर मध्ये आपण रिअल राहिलो नाही.
- Tue 13th Aug 2024 07:49 pm
यशोशिखर! चि. रियांश संतोष देशमुख याचे इ. ५ वी स्कॉलरशिप व सैनिक स्कूल परीक्षेत दैदिप्यमान यश
- Tue 13th Aug 2024 07:49 pm
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Tue 13th Aug 2024 07:49 pm
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Tue 13th Aug 2024 07:49 pm
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Tue 13th Aug 2024 07:49 pm
-
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Tue 13th Aug 2024 07:49 pm
-
सातारा पोलिसांची धडक कारवाई; सुमारे १९ लाखांचा बेकायदेशीर स्फोटकसाठा जप्त
- Tue 13th Aug 2024 07:49 pm
-
गुणवरेचा गांजा उत्पादक शेतकरी अंकुश कोळेकर ला फलटण ग्रामीण पोलिसांनी गांजा सह घेतले ताब्यात.
- Tue 13th Aug 2024 07:49 pm
-
पुसेगाव पोलिसांची मोठी कारवाई; खटाव जवळील मळवी शिवारात हातभट्टीवर छापा, १ लाख १ हजारांचा मुद्देमाल जप्त!
- Tue 13th Aug 2024 07:49 pm
-
स्थानिक गुन्हे शाखा व वडूज पोलिसांची धडाकेबाज कारवाई; 17.09 लाखांचा बेकायदेशीर स्फोटकसाठा जप्त
- Tue 13th Aug 2024 07:49 pm
-
चैन स्नॅचिंग करणारे सराईत गुन्हेगार यांना ढेबेवाडी पोलीस यांनी केली अटक
- Tue 13th Aug 2024 07:49 pm












