धैर्या'ने पूर्ण केला एव्हरेस्टचा बेस कॅम्प

पालकांशिवाय कामगिरी करणारी देशातील पहिली मुलगी

सातारा : एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण करणे हे अनेक गिर्यारोहकांचे स्वप्न असते. परंतु, हे आव्हानात्मक स्वप्न अनेकांचे स्वप्नच राहते. हे स्वप्न सत्यात उतरवण्याची गौरवास्पद कामगिरी येथील धैर्या विनोद कुलकर्णी हिने केली आहे. तीही वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी. इतक्या कमी वयात पालकांशिवाय बेस कॅम्प पूर्ण करणारी धैर्या देशातील पहिली मुलगी ठरली आहे.
एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करणे हे एक मोठे आव्हान असते. एव्हरेस्ट शिखर सर करण्यापूर्वी सर्वाधिक महत्वाचे असते ते एव्हरेस्ट बेस कॅम्प यशस्वीरीत्या पूर्ण करणे. कारण, भल्याभल्यांनाही हा कॅम्प पूर्ण करताना दमछाक होते, तर अनेकांना कॅम्प अर्धवट सोडून पाठीमागे वळावे लागते. परंतु, १२ वर्षीय धैर्या कुलकर्णी हिने पहिल्याच प्रयत्नात एव्हरेस्ट बेस कॅम्प सर केला. तिला गिर्यारोहक कैलास बागल यांनी मार्गदर्शन केले. तर वडील जनता बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन विनोद कुलकर्णी आणि आई शिक्षिका ज्योती कुलकर्णी यांनी प्रेरणा दिली.एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण करण्यासाठी धैयनि एव्हरेस्टकन्या प्रियंका मोहिते, गिर्यारोहक गगन हल्लर यांचे मार्गदर्शन घेतले. हा कॅम्प ५ हजार ५४५ मीटर इतका उंचीचा आहे. धैयनि दररोज १० ते १५ किलोमीटर असे चालत तब्बल १४ दिवसांमध्ये १३० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. तोही मायनस १० डिग्री तापमानामध्ये. आई-वडिल सोबत नसताना अवघ्या १२ वयाच्या मुलीने बेस कॅम्प पूर्ण करणे हे एकमेव उदाहरण ठरले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला