सातारा वाहतूक पोलीस बनले अपंग व्यक्तीचा 'आधार'

सातारा : आज दि.28/12/2022 रोजी सकाळी पोवाई नाका सातारा येथे कर्तव्यावर असताना एक अपंग व्यक्ती एक पायावर उड्या मारत रस्ता क्रॉस करत असताना दिसून आला. त्यास थांबवून मदती करिता विचारपूस केली व त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सागर बाबर रा शेणोली स्टेशन, ता कराड असे सांगून त्याचा सन 2012 रोजी रेल्वे अपघात झाला व त्यामध्ये त्याचा एक पाय गमावला असल्याचे सांगितले. तो कुबड्यांविना आजपावेतो एक पायावर चालत असून त्याची घरची परिस्थिती खूप नाजूक असलेने त्यास आजपर्यंत कुबड्या घेता येत नसलेचे समजले. तो कुबड्या घेण्यासाठी लोकांकडे मदत मागत असल्याने आम्ही सातारा शहर वाहतूक शाखेचे पोलीस विशाल मोरे, सुहास शिंदे, गौरी ढाणे, रेश्मा तांबोळी व पोलीस मित्र श्रीकांत पवार यांनी मदत म्हणून कुबड्या घेऊन दिल्या आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला