मुलीला पुढे आणण्यासाठी शरद पवारांनी नेत्यांना बाजूला केलं असावं..पृथ्वीराज चव्हाण
Satara News Team
- Thu 6th Jul 2023 08:46 pm
- बातमी शेयर करा
मुंबई : इतक्या वर्षापासून राष्ट्रवादीत धुसफुस सुरू होती. पक्ष चालवताना शरद पवारांच्या काही चुका झाल्या असतील. कौटुंबिक वादावर बोलणे योग्य होणार नाही. परंतु कौटुंबिक वाद असून त्याचा राज्याच्या राजकारणावर परिणाम होतोय. राष्ट्रवादीतील फूट वैयक्तिक पातळीवर झालीय हे खरे आहे. मुलीला पुढे आणण्यासाठी कदाचित नेत्यांना बाजूला केले असावे. हा त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे असा दावा काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, आरोप-प्रत्यारोप होत असतात. प्रफुल पटेल यांनी धमकी दिलीय, त्यांनी आत्मचरित्र लिहिलं की अनेक गोष्टी बाहेर पडतील. ज्या नेत्यांना शरद पवारांनी पुढे आणले ते आता आरोप करतायेत. महाविकास आघाडीवर या फुटीचा परिणाम झालाय. अजित पवारांसोबत जे आमदार गेले ते आमच्यासोबत होते आता तेविरोधात गेले. ४-५ मतदारसंघात त्याचा फटका बसेल. ज्याप्रकारे शिवसेनेत विभाजनानंतर नेते एकनाथ शिंदेंसोबत गेले परंतु कार्यकर्ते उद्धव ठाकरेंसोबत होते. तसेच शरद पवारांच्या बाबतीत झाले. नेते गेले पण कार्यकर्ते शरद पवारांसोबत आहेत असं त्यांनी म्हटलं.
तसेच शिंदे गटाचे ४०-५० आमदार आहेत त्यातील काहीच मंत्री बनलेत. १६ आमदार अपात्र झाले तर नवीन मुख्यमंत्र्यांची आवश्यकता असेल. अजित पवार हे मुख्यमंत्री बनतील असं आश्वासन भाजपाने दिले असावे. भाजपा, शिवसेना आमदारांमध्ये खूप नाराजी आहे. ९ राष्ट्रवादीचे आमदार बनलेत. त्यामुळे त्या जागा कमी झाल्या. बाकी जागा तिघांमध्ये वाटाव्या लागतील. राज्यातील अनिश्चिता बनली आहे. राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत. पाऊस झाला नाही, पेरणी झाली नाही. त्यात सरकारमध्ये नाराजी खूप आहे. सरकारकडे बहुमत पण आनंदी कोणच नाही असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.
दरम्यान, २०१९ मध्ये महाविकास आघाडी राज्यात बनली होती. मतदानाची आकडेवारी पाहिली तर हे आकडे जोडले तर महाविकास आघाडी ही भाजपा-शिवसेनेपेक्षा ८-१० टक्के अधिक आहे. ४८ पैकी ४२ जागा मागच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेनेला मिळाल्या होत्या. महाविकास आघाडी मजबूत असतील तर भाजपा एकेरी आकड्यात आली असती. ८ ते १० जागा भाजपा जिंकल्या असत्या. त्यामुळे मविआ कमकुवत करणे भाजपाचे काम होते असा आरोप काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
स्थानिक बातम्या
शाहूनगर चौकातील रस्ता खचला; उघड्या गटारामुळे अपघातांचा धोका
- Thu 6th Jul 2023 08:46 pm
शाळेच्या शेजारी मटक्याचा अड्डा? करंजे पेठेत अवैध धंद्याला कोणाचा 'राजा'शीर्वाद?
- Thu 6th Jul 2023 08:46 pm
मसूर पोलिस ठाण्यातील ई-चलान मशीन गैरवापराने शासकीय वाहने आणि शस्त्रांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर!
- Thu 6th Jul 2023 08:46 pm
पुसेसावळी येथे अन्न व औषध प्रशासनाच्या अभिनव उपक्रमातून रईस चा जन्म
- Thu 6th Jul 2023 08:46 pm
कोयना जलाशय परिसरातील ५०० दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात
- Thu 6th Jul 2023 08:46 pm
संबंधित बातम्या
-
कोयना जलाशय परिसरातील ५०० दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात
- Thu 6th Jul 2023 08:46 pm
-
दुर्योधनाच्या अहंकारामुळे महाभारत... जयकुमार गोरेंचा तोच अहंकार भाजपला नडणार ?
- Thu 6th Jul 2023 08:46 pm
-
डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात
- Thu 6th Jul 2023 08:46 pm
-
पुणे पदवीधर निवडणुकीत महायुतीची ताकद वाढली; शरद लाड, भैय्या माने डॉ. स्मिता जाधव यांच्या प्रचारात सक्रिय
- Thu 6th Jul 2023 08:46 pm
-
मतदारसंघ पुनर्रचना अजून झालीच नाही; मग शशिकांत शिंदेंची मुंबईत ‘राजकीय मोर्चेबांधणी’ कशासाठी?
- Thu 6th Jul 2023 08:46 pm
-
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Thu 6th Jul 2023 08:46 pm
-
कदमांना “ससा” म्हणत सपकाळांनी टोला मारला; पण आंबेघरचा पराभव आठवताच सोशल मीडियाने सपकाळांनाच घेरले!
- Thu 6th Jul 2023 08:46 pm












