सातारा पोलिसांच्या वतीने किल्ले अजिंक्यदाराची स्वच्छता मोहीम

सातारा : मकर संक्रात सणाचे औचित्य साधत अनेकजण विविध उपक्रम राबवितात. सातारा पोलीस दलाने मकर संक्रांतीचे औचित्य साधून “गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आज पासून अनोख्या उपक्रमाला सुरुवात केली आहे. आज जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह पोलीस दलातील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अजिंक्यतारा किल्य्यावर जाऊन स्वच्छता केली. त्यांच्या या मोहिमेचे सर्वत्र कौंटुक होत आहे.

सातारा येथे मकरसंक्रांतीच्या औचित्य साधून आजपासून सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ‘आपले किल्ले, आपली‌ जबाबदारी’ या मोहिमेस सुरुवात करण्यात आली. आज सकाळी या मोहिमेला अजिंक्यतारा किल्ल्यावरून प्रारंभ करण्यात आला. यामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गडावरील गवत, कचरा एकत्रित करत स्वच्छता केली.

अजिंक्यतारा किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आता सातारा जिल्ह्यातील प्रत्येक गडावर स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक रविवारी सातारा पोलीस दलातील कर्मचारी ही मोहीम राबविणार आहेत. या मोहिमेत पोलिसांच्या बरोबरीने साता-यातील नागरिक, व्यापारी, तरुणांनी यात सहभाग घ्यावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला