डी जी कॉलेज एनसीसी कॅडेट साक्षी साळुंखेची ऑल इंडिया थल सैनिक कॅम्प दिल्ली येथे निवड
Satara News Team
- Sat 10th Sep 2022 10:39 am
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा येथील धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय व 22 महाराष्ट्र बटालियन एनसीसी सातारा ची कॅडेट साक्षी साळुंखे हिची दिल्ली येथे ११ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२२ या कालावधीत संपन्न होणाऱ्या ऑल इंडिया थल सैनिक कॅम्प या राष्ट्रीय स्तरावरील कॅम्पसाठी निवड झाली आहे. या शिबिरात निवडीसाठी मागील तीन महिन्यापासून साक्षी साळुंखे कोल्हापूर एनसीसी ग्रुप हेडकॉटर येथे संपन्न झालेल्या विविध कॅम्पान मधून कठोर परिश्रम घेऊन याटप्प्यापर्यंत पोहोचलेली आहे.
एनसीसी थल सैनिक कॅम्प च्या निवडीसाठी विद्यार्थ्यांमधील युद्ध कौशल्य, युद्धातील डावपेच, फील्ड क्राफ्ट, बॅटल क्राफ्ट, मॅप रीडिंग, ऑबस्टीकल ट्रेनिंग फायरिंग इत्यादी कौशल्य तपासले जातात व या कौशल्याच्या आधारावर विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावरील कॅम साठी निवड होत असते. या कॅम्पच्या माध्यमातून कॅडेट साक्षी साळुंखे दिल्ली येथे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. तिच्या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॅा. अनिल पाटील, सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर, सहसचिव डॉ. शिवलिंग मेनकुदळे तसेच डी.जी. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळ कांबळे, उपप्राचार्य डॅा. व्ही.के. सीवंत कंपनी कमांडर लेफ्टनंट डॉ. राजशेखर निलोलू यांनी अभिनंदन केले आहे. 22 महाराष्ट्र बटालियन एनसीसी सातारा चे कमांडिंग ऑफिसर कर्नल डी. एम. ठोंगे, प्रशासकीय अधिकारी कर्नल व्ही. एम. भालसिंग, सुभेदार मेजर तपासे, सर्व रॅंक यांनी छात्रास शिबिराच्या तयारीसाठी मार्गदर्शन केले आहे. बटालियनचे सर्व अधिकारी व एन सी सी सिविल स्टाफ कडून तिचे कौतुक होत आहे.
स्थानिक बातम्या
सराईत घरफोड्या चोरट्याच्या टोळीचा पर्दाफाश; 27.65 लाखांचा मुद्देमाल जप्त
- Sat 10th Sep 2022 10:39 am
सातारा न्यूजचा दणका, अन्न व औषध प्रशासनाकडून फलटणमध्ये मोठी कारवाई
- Sat 10th Sep 2022 10:39 am
कॉपर वायर व ट्रान्सफॉर्मर चोरी करणारी टोळी गजाआड; 26 गुन्ह्यांची उकल, 20.22 लाखांचा मुद्देमाल जप्त.
- Sat 10th Sep 2022 10:39 am
साताऱ्यात देशी पिस्टलसह संशयित जेरबंद; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
- Sat 10th Sep 2022 10:39 am
सातारा जिल्ह्यातील शिवसेनेत शीतयुद्ध; लाभार्थ्यांची टोळी विरुद्ध निष्ठावंत - रणजितसिंह भोसले
- Sat 10th Sep 2022 10:39 am
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Sat 10th Sep 2022 10:39 am
संबंधित बातम्या
-
माजी उपसभापती चंद्रकांत कदम (पाटील) यांचे निधन.
- Sat 10th Sep 2022 10:39 am
-
सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले
- Sat 10th Sep 2022 10:39 am
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sat 10th Sep 2022 10:39 am
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sat 10th Sep 2022 10:39 am
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Sat 10th Sep 2022 10:39 am
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Sat 10th Sep 2022 10:39 am













