आदर्की खुर्द येथे कुऱ्हाडीचा घाव घालून शेतकऱ्याचा खून
Satara News Team
- Thu 4th Apr 2024 01:32 pm
- बातमी शेयर करा
आदर्की : फलटण तालुक्यातील आदर्की खुर्द येथे बोअरवेल मशीन व पिकअप वाहन बांधावरून नेल्याने बांध खराब झाला. या कारणावरून चंद्रशेखर बबनराव निंबाळकर (वय ४८, रा. आदर्की खुर्द, ता. फलटण) या शेतकऱ्याचा एकाने डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृण खून केला. ही धक्कादायक घटना मंगळवारी घडली. या प्रकारानंतर लोणंद पोलिसांनी अवघ्या एका तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
सयाजी शंकर निंबाळकर (वय ५१, रा. आदर्की खुर्द, ता. फलटण) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून व लोणंद पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, आदर्की खुर्द (ता. फलटण) गावच्या हद्दीत चिंचेचा मळा नावचे शिवार आहे. या शिवारात चंद्रशेखर निंबाळकर यांनी सयाजी निंबाळकर याच्या शेताच्या बांधावरून चार दिवसांपूर्वी बोअरवेलची मशीन व पिकअप वाहन नेले होते. त्यामुळे बांध खराब केल्याचा राग सयाजी निंबाळकर याच्या मनात होता.
मंगळवार दि. २ रोजी सायंकाळी दोघेही चिंचेचा मळा नावाच्या शिवारात गेले होते. त्यावेळी सयाजी निंबाळकर याने चंद्रशेखर निंबाळकर यांच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून त्यांना गंभीर जखमी केले. या प्रकाराची माहिती ग्रामस्थांना मिळताच त्यांना उपचारासाठी फलटण येथे नेण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
खुनाची घटना पोलिसांना समजताच उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यादरम्यान संशयित सयाजी निंबाळकर याला पोलिसांनी अवघ्या एका तासात अटक केली. न्यायालयाने त्याला दि. ८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सुशील भोसले हे करीत आहेत.
दिवसा वाढदिवसाचे, तर सायंकाळी श्रद्धांजलीचे मेसेज..
चंद्रशेखर निंबाळकर यांचा वाढदिवस दि. २ रोजी असल्याने गावच्या व्हाॅट्सॲप ग्रुपवर वाढदिवसाच्या शुभेच्छा अनेकजण त्यांना देत होते. तर सायंकाळी चंद्रशेखर यांचा मृत्यू झाल्याचे समजताच गाव सुन्न झाले. व्हॉट्सॲप ग्रुपवर अखेर श्रद्धांजलीचे मेसेज फिरू लागले.
स्थानिक बातम्या
कुसुंबी गणात मंत्री शिवेंद्रराजेंचा करिष्मा चालणार
- Thu 4th Apr 2024 01:32 pm
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Thu 4th Apr 2024 01:32 pm
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Thu 4th Apr 2024 01:32 pm
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Thu 4th Apr 2024 01:32 pm
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Thu 4th Apr 2024 01:32 pm
संबंधित बातम्या
-
युवतीला लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार; करंजे येथील युवकावर गुन्हा दाखल
- Thu 4th Apr 2024 01:32 pm
-
ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात अवैध धंद्यांचा 'ग्रामीण विकास'
- Thu 4th Apr 2024 01:32 pm
-
चोरीला गेलेले व गहाळ झालेले २० मोबाईल व ०१ टॅब यांचा शोध घेऊन तक्रारदार यांना वाई पोलिसानी केले परत
- Thu 4th Apr 2024 01:32 pm
-
घरगुती वादातून दिराने केला वहिनीचा विनयभंग !
- Thu 4th Apr 2024 01:32 pm
-
औंध पोलीस ठाण्यातील सायबर आणि क्राईम विभागाची उल्लेखनीय कामगिरी.
- Thu 4th Apr 2024 01:32 pm
-
फलटणमध्ये पोलिसांसमोरच हवेत गोळीबार; एकजण ताब्यात, एक फरार
- Thu 4th Apr 2024 01:32 pm
-
वृद्धेच्या डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेप.
- Thu 4th Apr 2024 01:32 pm
-
गुरु द्रोणा अकॅडमी फलटण येथे विद्यार्थ्यास मारहाण.
- Thu 4th Apr 2024 01:32 pm













