शिवराज्याभिषेक दिनानिमित्त खेड, ता. सातारा येथून आ. महेश शिंदे व शिवभक्तांनी ढोल-ताशांच्या गजरात काढली दुचाकीवरून भव्य रॅली

खेड :  शिवराज्याभिषेक दिनानिमित्त खेड, ता. सातारा भागातून आ. महेश शिंदे व शिवभक्तांनी ढोल-ताशांच्या गजरात दुचाकीवरून भव्य रॅली काढली. यावेळी संपूर्ण परिसर शिवमय झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे सुरू होत आहेत. शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने शुक्रवारी खेड भागात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी बॉम्बे रेस्टॉरंट चौकात आ. महेश शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. त्यानंतर फुलांनी सजवलेल्या वाहनातून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली.त्या समोर ढोल- ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजी सुरू होती.

 

यावेळी खेड भागातून आ. महेश शिंदे यांनी काढलेली दुचाकी रॅली. भगवे फेटे, टोप्या परिधान करून व हाती भगवे झेंडे घेऊन दुचाकीवरून आ. महेश शिंदे व शिवभक्तांनी बॉम्बे रेस्टॉरंट, खेड, वाढे
चौकमार्गे खेड गावठाण, प्रतापसिंहनगर, विकासनगर, संगम माहुली, संगमनगर, गुरुदत्त कॉलनी, वनवासवाडी या भागातून भव्य रॅली काढली. यावेळी ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर नागरिकांनी पुष्पवृष्टी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जयघोष करण्यात आला. त्यावेळी संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील नटराज मंदिर येथे रॅलीची सांगता करण्यात आली. रॅलीत खेडच्या सरपंच लता फरांदे, कांतिलाल कांबळे, सुधीर काकडे, विजय माने ,विनोद माने, गणेश पालखे, शरद शेलार, शामराव कोळपे, स्वप्निल बोराटे, सुमित माने,अशोक फरांदे, सुशांत देशपांडे, श्रीधर शिंदे, मयूर गंगणे, संजय गायकवाड, संदीप चव्हाण यांच्यासह महिला, युवती, युवक व आ. महेश शिंदे विचारमंचचे कार्यकर्ते, शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला