निंभोरे येथील दुहेरी खुनाच्या प्रकरणात अवघ्या 10 तासांत आरोपींला ठोकल्या बेड्या

फलटण ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हे पोलिसांची कामगिरी,

फलटण : फलटण तालुक्यातील निंभोरे गावाच्या हद्दीत पालखी महामार्गावरील नवीन उड्डाणपूल शेजारी सख्ख्या बहिण भावाच्या खून झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सदरच्या घटनेने फलटण तालुक्यात खळबळ उडाली होती. 

घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, शीतल तुकाराम शिंदे (वय ३5 ) व सुमित तुकाराम शिंदे (20 ) असे खून झालेल्या बहीण भावाचे नाव आहे. दिनांक २५ रोजी शनिवारी सकाळी उघडकीस आली असता ग्रामीण पोलिसांना याबाबत अवगत करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच फलटण ग्रामीण पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस व फलटण ग्रामीण पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास कामी सूचना दिल्या होत्या . हा खून कोणी व का केला  याचा पोलिस तपास करत आहेत. घटनास्थळी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे कर्मचारी  पंचनामा करण्याची कारवाई केली  फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला 
घटनेची गांभीरे ओळखून समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा पोलीस अधीक्षक सातारा राहुलदास उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण आणि अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा तसेच सुनील महाडिक पोलीस निरीक्षक फलटण ग्रामीण पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथके तयार करून गुन्हा उघडकीस आणण्यासाठी योग्य त्या सूचना दिल्या

घटनास्थळावर काही धागेदोरे नसताना पोलिसांनी तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आदाराखाली तपास सुरू केला तपासात मयत शीतल तुकाराम शिंदे उर्फ शीतल रणजीत फाळके हिचा दोन वर्षांपूर्वी तिचा पहिला नवरा कन व -या भीम-या  पवार राहणार वाळवा जिल्हा सांगली या सोडून देऊन रणजीत मोहन फाळके मुळगाव सातारोड तालुका कोरेगाव जिल्हा सातारा याच्याबरोबर ती आई-वडिलांजवळ झोपडी मध्ये राहत होती सदरची घटना घडली तेव्हा सुद्धा रणजीत मोहन फाळके हा तिच्यासोबत झोपडीमध्ये झोपला होता परंतु बहीण व भावांचे मृतदेह मिळून आल्यानंतर त्याने तिथून पलायन केले.  फलटण पोलिसांनी त्याला सातारोड तालुका कोरेगाव येथील ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केले असता त्यांनी सुरुवातीला दिशाभूल करणारी माहिती सांगितली परंतु पोलिसांनी खात्यात दाखवताच त्याने शितल ही झोपेतून उठून परपुरुषाबरोबर कुठेतरी जात असल्याचे दिसल्यामुळे तो झोपडीतील चाकू घेऊन तिच्या मागोमाग  गेला काही अंतरावर गेल्यानंतर त्याने शीतला गाठून तिच्या छातीवर चाकू खुपसून तिचा खून केला.  त्यावेळी तिच्यासोबत असलेला तिचा भाऊ सुमित तुकाराम शिंदे यास त्याने अंधारात न ओळखल्यामुळे त्यांनी तो परपुरुष आहे असे समजून त्याने त्याच्याही छातीवर चाकू खुपसून त्याचाही निर्गूण खून केलाअशी माहिती आरोपी रणजीत मोहन फाळके याने पोलिसाना दिली.  

आरोपी रणजीत मोहन फाळके  वय  45 यास फलटण पोलिसांनी अटक केल्यानंतर अनुसूचित जाती-जमातीतील बहिण-भाऊ असल्याने त्याच्यावर ॲट्रॉसिटी कायदा अंतर्गत आणखीन एक कलमाची वाढ केली हा गुन्हा घडल्यानंतर दहा तासाच्या आत आरोपीला बेड्या घातल्याने पोलीस अधीक्षक श्री समीर शेख श्रीमती आचल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक यांनी तपासा कामी आलेल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. 

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त