डि.वाय.एस.पी.अश्विनी शेंडगेंनी निर्भया पथकातील मनमानी केलेल्या बदल्यांमुळे शाळकरी विद्यार्थीनींच्या आयुष्यात बॅड टच् वाढले ?

  पुसेसावळी :  शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यीनींच्या सुरक्षितता आणि वाढते लैंगीक अत्याचार यांस आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने "निर्भया पथक" आणि तत्सम कार्य करणाऱ्या सखी सावित्री, भरोसा सेल सह अन्य पथके निर्माण केल्याचे दिसून येते.शाळकरी, विद्यालयीन, महाविद्यालयीन विद्यार्थीनीं यांना या पथकांच्या माध्यमातून 'गुड टच्' आणि 'बॅड टच् ' यांसह स्वसंरक्षणासाठी आवश्यक ती काळजी, उपायोजना शासनाने निर्माण केलेले हेल्पलाईन नंबरचा वापर याबाबत मार्गदर्शन करून युवती आणि महीला सशक्तीकरण करण्याचा हेतू परिपुर्ण साध्य व्हवा याकरिता तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर, विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कार्यक्षेत्रात २०१८ साली निर्भया पथकांची निर्मिती करण्यात आली. त्यापैकी माण - खटाव च्या युवती आणि महीलांवरील वाढते शोषण पाहता तत्कालीन मा.उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल वडनेरे यांच्या कटाक्ष दृष्टीने दहिवडी पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचारी तानाजी चंदनशिवे, औंध पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी विजय बर्गे, म्हसवड पोलीस ठाण्याच्या महिला पोलिस कर्मचारी राणी खाडे, वडूज पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस कर्मचारी स्नेहल पवार असे २ महिला आणि २ पुरूष कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती.

       मा‌.उपविभागीय पोलिस अधिकारी, अनिल वडनेरे यांनी सदरच्या निर्भया पथकात केलेल्या कर्मचाऱ्यांची योग्य निवड आणि त्या निवडीस साजेसे असे उत्कृष्ट आणि तत्परतेने केलेली कामगिरीची पोच पावती म्हणून त्यानंतर मा‌.उपविभागीय पोलिस अधिकारी, बाबूराव महामुनी आणि मा.उपविभागीय पोलिस अधिकारी, अनिल देशमुख यांनीही तानाजी चंदनशिवेंसह इतर कर्मचाऱ्यांवर हिच जबाबदारी दिलेली होती. या पथकाकडून कार्यक्षेत्रातील शाळा, विद्यालय आणि महाविद्यालयात वेळोवेळी केलेले समुपदेशक मेळावे आणि त्यातील मार्गदर्शनामुळे विद्यार्थीनींना तसेच त्या विद्यर्थीनींनी संपर्कात असलेल्या परंतू शाळेय जिवणा पासून वंचित असलेल्या युवती आणि महीलांशी केलेल्या चर्चेतून महिला सशक्तिकरणास आलेली ऊर्जितावस्थेत कमालीची वाढ झाल्याची चर्चा आहे. 

            परंतू मा.उपविभागीय पोलिस अधिकारी पदाची जबाबदारी अश्विनी शेंडगे यांनी स्विकारले नंतर अल्पावधीतच म्हणजे नोव्हेंबर २०२३ मध्ये कार्यरत असलेल्या निर्भया पथकाला "बॅड टच्" देत कार्यक्षम असलेल्या टिम ला बाजूला सारून मर्जीतील कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. अन् नव्याने कार्यान्वित झालेले निर्भया पथक "फरारी तथा अदृश्य" झाले कि काय? ते पुन्हा दिसलेच नाही. फक्त कागदोपत्री कार्यरत असून वरिष्ठांच्या अहवालापुरते असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तिन्ही तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी निर्भया पथकाला बळ दिले असले तरी विद्यमान उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी त्याचे पुरते अस्तित्वच धोक्यात आणल्यानेच पुन्हा एकदा शाळा, महाविद्यालयीन परिसरात टवाळखोरी अन् छेडछाडीचे असूर डोके वर काढत असल्याची चर्चा आहे.

 

औंध चे सहायक पोलिस निरीक्षक चिमणाजी केंद्रे कर्तव्यासोबतच जपत आहेत सामाजिक बांधिलकी...

         उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगेंच्या नोव्हेंबर २०२३ मधील निर्भया पथकातील बदल आणि गायबच झालेले "भरारी पथक" यासोबतच युवतींची छेडछाड,महिला अत्याचार सारख्या गुन्ह्यांमधील लाक्षणिक वाढ यामुळे कर्तव्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत कार्यक्षेत्रातील शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थीनींना "गुड टच् आणि बॅड टच्" बाबत पालक मेळावे घेऊन मार्गदर्शन करावे लागत आहेत. हे उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या नाकर्तेपणाचीच पोचपावती आहे काय? याचे आत्मपरीक्षण संबंधित उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी करणे आवश्यक आहे.

 

     एस.पी.साहेबांनी माण - खटाव च्या निर्भया पथकावर लक्ष देण्याची गरज...

    महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती आणि महिलांवरील वाढते छेडछाड आणि लैंगीक अत्याचार पाहता सातारा जिल्ह्यातील प्राधान्याने विद्यमान उपविभागीय पोलिस अधिकारी, अश्विनी शेंडगे यांच्या कारकिर्दीतील माण - खटाव मधील परिस्थितीचा विचार करता निर्भया पथकाला ऊर्जितावस्था आणि महिलांच्या विश्वासाला गेलेला तडा भरून येण्यासाठी मा.जिल्हा पोलिस अधीक्षक, समिर शेख यांनी माण - खटाव च्या "निर्भया पथक" विद्यमान उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांवर विसंबून न ठेवता स्वतः लक्ष केंद्रित करण्याची मागणी महिला वर्गाकडून दबक्या आवाजात होत असल्याचे दिसून येत आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त