चितळी येथील अल्पवयीन मुलींची छेडछाड करणारे तिन इसमांना वडूज पोलीसांनी केली अटक.

वडूज  ; ३०  ऑगस्ट २०२४ रोजी मौजे चितळी येथील दोन अल्पवयीन मुलींची छेडछाड करणारे तिन इसमाचे विरुध्द वडूज पोलीस ठाण्यात २९१/२०२४ बी.एन.एस. कलम ७४,७५ बालकांचा लैगींक अत्यारापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

               सदर गुन्हयातील अल्पवयीन दोन्ही पिडीतेस आरोपींनी शाळेत जात असताना पिडीतेची छेडछाड करण्याचे हेतुने अडवणूक केले बाबतची माहिती निर्भया पथक नं.५ यांना प्राप्त झाल्यानंतर मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अश्विनी शेंडगे मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली निर्भया पथक वडूज यांचेकडून कारवाई करत सदर पिडीतेचे समुपदेशन करणेत आले आहे. सदर आरोपी १) अविनाश महादेव जाधव,वय १९ वर्षे २) आर्यन युश्यन भिसे, वय १९ वर्षे ३) विजय दयानंद मदने वय १९ वर्ष यांचा काही तासांतच शोध घेवुन सदर गुन्हयात अटक करणोत आली असून मा. न्यायालयात हजर केले असता सदर आरोपींना तिन दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे.

           सदर गुन्हयाची कारवाई मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीमती अश्विनी शेंडगे मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली वडूज पोलीस ठाण्याचे तडफदार पोलीस निरीक्षक, श्री.धनशाम सोनवणे, यांनी केली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक, अमोल कदम, पो. हवा. नाना कारंडे, पो. कॉ. अजित काळेल, निर्भपथकाचे पोलीस अंमलदार पो.ना. सचिन जगताप, पो.कॉ. सागर पोळ, पो.कॉ. संजय जाधव पो.कॉ.राजश्री खाडे, पो.कॉ. सुमाली घाडगे सहभागी होते. सदर गुन्ह्याचा पुढील तपास वडुज पोलीस ठाणेचे पोलीस उपनिरीक्षक श्री. कांबळे हे करीत आहेत.

 

निर्भया पथकाने "निर्भय" पेक्षा "भय" निर्माण करण्याची गरज...

             निर्भया पथकाकडून अन्याय, अत्याचार आणि लैंगीक अत्याचाराचे बळी पडत असलेल्या शाळा, विद्यालय आणि महाविद्यालयातील शालेय विद्यार्थीनींना गुड टच् आणि बॅड टच् बाबत "निर्भय" करण्याबरोबरच असले अघोरी आणि समाजविघातक कृत्य करणाऱ्या नराधमांच्या मनात "भय" निर्माण करण्यासाठी आपल्याला शासनाने दिलेल्या अधिकाराचा गैरवापर न करता परिपुर्ण वापर करण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून गुन्हा घडल्यानंतर समुपदेशन करण्यापेक्षा असले अघोरी कृत्य करण्यापुर्वी निर्भया पथकाचे कर्मचारी डोळ्यांसमोर दिसले पाहिजेत आणि त्यांच्या मनातही छेडछाड करण्याचे देखील विचार निर्माण होता कामा नये.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त