शिंगणापूर नातेपुते घाटातील अपघात करून पळालेला आरोपीला पकडले.

दहिवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

आंधळी : सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि शिंगणापूर पोलीस चौकी टीमने नातेपुते घाटात हिट अँड रन करून पळालेला आरोपी याला जालना येथे पळून जात असताना शीताफिने पकडले

 

शिंगणापूर नातेपुते घाटात हार्वेस्टर मशीन घेऊन जात असताना मोटरसायकलला धडक मारून त्यावरील इसमांच्या मरणास कारणीभूत होऊन घटनास्थळावरून पळून गेलेला आरोपी नामे रामदास दत्ता वाघमारे हा त्याच्या मूळ गावी जालना येथे पळून चाललेला होता. सदरचा गुन्हा नातेपुते पोलीस स्टेशनला दाखल झालेला होता. दहिवडी पोलीस स्टेशन अंकित शिंगणापूर पोलीस यांनी याबाबत माहिती मिळाल्यानंतर सदरचा आरोपी हा दहिवडी एसटी स्टँड येथे असल्याची माहिती प्राप्त करून त्याला जालना येथे पळून जात असताना ताब्यात घेऊन नातेपुते पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.

 

सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, महिला पोलीस उपनिरीक्षक चांदणी मोटे, पोलीस हवालदार नंदकुमार खाडे, पोलीस नाईक नितीन धुमाळ, पोलीस कॉन्स्टेबल महेश सोनवलकर, पोलीस कॉन्स्टेबल संतोष विरकर, पोलीस कॉन्स्टेबल विलास हांगे यांनी केली आहे

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त