मानसिक तणावातून रविवार पेठेतील एकाची आत्महत्या

Suicide of one of Sunday Pethe due to mental stress

सातारा : शहरातील रविवार पेठेत राहत असलेला एक 35 वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली. उमेश रमेश जाधव असे त्यांचे नाव आहे. तीन महिन्यापुर्वी त्याच्या पत्नीने विष प्राशन केल्याने तिचा मृत्यू झाला होता. या मृत्यूस पत्नीच्या नातेवाईकांनी त्याला जबाबदार धरल्याने तो मानसिक तणावात होता. यामुळे त्याने आत्महत्या केली. यांची माहिती आई सुनिता रमेश जाधव(वय 50) यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उमेश जाधव यांची पत्नी सोबत वाद झाला होता. या वादामुळे ती माहेरी निघून गेली होती. काही दिवसांनी ती माहेरी परत आली. यावेळी तिने विष प्राशन केले. तिच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते. परंतु उपचारदरम्यान, तिचा मृत्यू झाला. या मृत्यूस पती उमेश हा जबाबदार असल्याने तिच्या नातेवाईकांनी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तोच उमेशला अटक झाली. तो गेले तीन महिने तुंरूगात होता. बुधवार दि. 27 रोजी तो जामीनावर सुटला. आणि रविवार पेठेतील घरी राहण्यासाठी आला. तरीही तो मानसिक तणावात होता. या तणावातून त्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत शनिवारी सकाळी आईला आढळून आला. यांची माहिती शहर पोलीसांनी देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येवून पाहणी केली असता तो मयत झाल्याचे सांगण्यात आले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला