राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांना पितृशोक

दहिवडी : राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांचे वडील श्री. भगवानराव रामचंद्र गोरे यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. भगवानराव गोरे यांच्यावर मागील काही दिवसांपासून पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाची बातमी कळताच माण तालुक्यात शोककळा पसरली आहे.

भगवानराव गोरे यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांचे पार्थिव आज दि. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत बोराटवाडी येथील निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्यावर बोराटवाडी (ता. माण, जि. सातारा) येथे दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.


आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला