पुसेसावळी दुरक्षेत्राच्या खाकीची चर्चा अन् कौतुकही.

पुसेसावळी  : रहाटणी, ता.खटाव येथील अंकुश आबा थोरात या शेतकऱ्याची ५० हजारांची रोख रक्कम आणि कागदपत्रे असलेली पिशवी पुसेसावळी येथील दत्त चौकात गहाळ झाली होती. त्याबाबत पुसेसावळी दुरक्षेत्रात थोरात यांनी झालेल्या घटनेची माहिती दिल्यानंतर तातडीने पोलिस उपनिरीक्षक अनिल एल.शिरोळे व पोलिस हवालदार एन. के. कांबळे बक्कल नंबर १३५३ यांनी सि.सी.टि.व्ही. फुटेज आणि तांत्रिक माहिती च्या अधारे शोध घेतला असता सदरची पुसेसावळी येथील मुख्य चौकात पडून गहाळ झालेली पिशवी राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचारी दिलीप तुकाराम कुंभार, रा. नागझरी, ता. कोरेगांव यांना सापडल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास संपर्क साधला असता त्यांनीही मान्य करून सदरची पिशवी तातडीने पुसेसावळी दुरक्षेत्रात येऊन पोलिस उपनिरीक्षक अनिल शिरोळे आणि पोलिस हवालदार विजय कांबळे यांच्या समक्ष अंकुश आबा थोरात यांना सुपुर्द केली. 


 शासकीय काम सहा महिने थांब सह खाकीचा खाक्या आपल्याला सर्वत्रच पहायला मिळते. शिवाय गहाळ, चोरी सारख्या घटनांची फिर्याद पोलिस ठाण्यात देण्यासाठी जाताना "भिक नको पण् कुत्रं आवर" सारखी अनुभूती नक्कीच सर्वसामान्य नागरिकांना होत असते. त्यामुळे गहाळ, चोरीच्या माध्यमातून झालेले आर्थिक नुकसान अन् पोलिस ठाण्यात गेले तर दिरंगाई सह शोध लागण्याची शक्यता कमी अशी तयार झालेली मानसिकता पुसण्यासारखे कार्य पुसेसावळी दुरक्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तत्परतेने केल्याने अंकुश आबा थोरात यांनी पोलिस प्रशासनाचे आभार मानले. यासोबतच सर्वच स्तरातून पुसेसावळी पोलिसांचे कौतुक केले जात आहे. 


गुन्हेगारीला चाप बसवण्यासाठी सिसीटिव्ही ची मोलाची साथ - अनिल शिरोळे. 

 पुसेसावळी दुरक्षेत्रात प्रभारी म्हणून कार्यरत झाले नंतर माहीती घेत असताना जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख आणि पुसेसावळी ग्रामपंचायत च्या माध्यमातून संपूर्ण पुसेसावळी शहरात सुमारे ३६ सिसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे पुसेसावळी शहरातील प्रत्येक ठिकाणी दुरक्षेत्रातून चोवीस तास नजर ठेवली जात आहे. यामुळे होणाऱ्या संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून गुन्हेगारीवर चाप बसवण्यासाठी सिसीटिव्ही ची मोलाची साथ मिळत असल्याचे पुसेसावळी दुरक्षेत्राचे प्रभारी पोलिस उपनिरीक्षक अनिल शिरोळे यांनी सांगितले.


आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त