शिवडे फाटा अंधारातच! यात्रेपूर्वी लाईट सुरू न झाल्यास शिवसेनेचा इशारा — आंदोलन अटळ!

शिवडे फाटा (ता. कराड) – शिवडे फाट्यावर गेल्या दोन महिन्यांपासून हायवेवरील लाईट बंद असून, संपूर्ण परिसर अंधारात गेलाय. शॉर्टसर्किटमुळे जळालेल्या वायरिंगचं काम काही दिवसांपूर्वीच 'राज इन्फ्रा कन्स्ट्रक्शन' कंपनीने पूर्ण केलं, तरीही लाईट सुरू न झाल्यामुळे लोकांमध्ये संतापाचा सूर आहे. 


 या अंधारामुळे अपघात, चोरी, शेतकऱ्यांचे नुकसान अशा घटना घडण्याचा धोका निर्माण झाला आहे. याच भागात मायाक्कामातेचे मंदिर असून, हजारो भाविकांची यात्रा दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी भरत आहे. यात्रेच्या पूर्वसंध्येला देखील लाईट बंद असतील, तर भाविकांसाठी हे अत्यंत असुरक्षित ठरेल. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कराड उत्तर तालुकाप्रमुख श्री. संजय गुलाबराव भोसले यांनी उंब्रज वीज मंडळाला निवेदन देत ५ एप्रिलपर्यंत लाईट सुरू न झाल्यास "शिवसेना स्टाईल"ने आंदोलन छेडले जाईल, असा थेट इशारा दिला आहे.


 "लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या प्रशासनाची जबाबदारी झटकून चालणार नाही. वेळेत लाईट सुरू न झाल्यास वीज विभागाला याची जबाबदारी घ्यावी लागेल," असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. निवेदन देताना संभाजी घाडगे, सागर कुलकर्णी, शंकरराव घाडगे, कोंडीबा गुजले, सोन्या जांभळे, विलास कारंडे, श्री गमाने, साहिल मुल्ला, . पालसांडे ,शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून तात्काळ लाईट सुरू करावेत, हीच जनतेची मागणी आहे.


लाईट बिल थकीत असल्यामुळे लाईट बंद करण्यात आली आहे एन एच आय नॅशनल हायवे यांनी ते बिल भरायचे आहे आदानी कंपनीचे सचिन देवकर ते लाईट बिल भरत असतात त्यांच्याशी सकारात्मक चर्चा झालेली आहे लवकरच लाईट सुरु होईल 
 वैशाली जाधव वरिष्ठ अधिकारी महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी उंब्रज
आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त