वडी ता.खटाव येथील पारायण सोहळा दि.१४ तर मुख्य यात्रेस दि.२१ पासून प्रारंभ

पुसेसावळी : वडी ता. खटाव येथील सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहास दि. १४ मार्चपासून सुरुवात होत आहे. ह.भ.प.वै. पुंडलिक महाराज वेळूकर व ह.भ.प. रंगनाथ महाराज यांच्या प्रेरणेने गेली ३८ वर्षे अविरतपणे सुरु असलेली ही परंपरा यंदा ३९ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. श्री सिद्धनाथ देवस्थान ट्रस्ट व मुंबईकर आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन दरवर्षी केले जाते. यानिमित्ताने यावर्षीच्या पारायण सोहळ्याचा शुभारंभ मठाधिपती विट्ठल स्वामी महाराज यांचे शुभहस्ते होणार असून दि. १४ एप्रिल ते दि.१९ एप्रिल पर्यंत अखंड, अविरत साजरा होणा-या या सोहळ्यासाठी ह.भ.प. विठ्ठलस्वामी महाराज, ह.भ.प. सुप्रियाताई मोरे, ह.भ.प. तृप्तीताई शिंदे, ह.भ.प. संदिप महाराज, ह.भ.प. अनिल डुबले, ह.भ.प. श्रीमंत कोकाटे महाराज यांचे सुश्राव्य किर्तन व श्री. वसंत महाराज, श्री. मधुकर मांडवे, श्री. जहांगीर मुलाणी, वडी, श्री. नवनाथ महाडीक, वडी श्री, रिंकेश महाराज , श्री. विजय सावंत या प्रबोधनकारांचे ज्ञानेश्वरीतल्या विविध विषयांवर आधारीत प्रवचनाचे आयोजन केले आहे. ग्रंथवाचनाची गोडी वाढून वाचकांची संख्या वाढावी याहेतूने यंदा ह.भ.प. रिंकेश महाराज, सातारा यांना व्यासपीठ चालकाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच ज्ञानोबाराय वारकरी शिक्षण संस्था, देवाची आळंदी येथील प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना हरीपाठ व किर्तनासाठी आणि गावातील लहान-थोर मुलांना हरीनामाची ओढ लागण्यासाठी या सोहळ्यासाठी विषेश आमंत्रित करण्यात आले आहे. 

 आपणही समाजाशी काही देणे लागतो या उदात्त हेतूने गावातील दानशुर लोकांनी यासाठी हातभार लावला आहे‌. त्यामधे शिवाजी येवले मेंबर, प्रशांत येवले, बाळासो येवले गुरुजी, नामदेव पाटील, सागर येवले अध्यक्ष, भिकू केरु येवले, सुधाकर गोडसे, शंकर मोहीते, विलास येवले, संदिप येवले, यशवंत सुर्यवंशी, दिनकर येवले, पांडुरंग येवले, ज्ञानदेव येवले, अनिल सुर्यवंशी, शिवतेज मित्र मंडळ, दादासो भिंताडे, संदिप शिवाजी येवले, विकास मोहीते, विठ्ठल नांगरे या सर्व ग्रामस्थांकडे नाश्ता व संतपंगतीचे आयोजन केले आहे. तसेच भाविकांना सुश्राव्य किर्तनाची संधी मिळणेसाठी चंद्रकांत येवले साहेब, धनाजी येवले बापू, सोमनाथ मिठारे, अभिजीत येवले, संजय मोहीते, संजय येवले साहेब, देवदास येवले साहेब यांनी किर्तन सौजन्य दिलेले आहे. 

 पहाटे ४ ते ६ काकड आरती, सकाळी ७:३० ते १२:३० ग्रंथवाचन, सायं.५ ते ६ प्रवचन, सायं.६ ते ७ हरीपाठ, रात्रौ.९ ते ११ किर्तन व रात्रौ.१२ ते ४ जागर अशाप्रकारे दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत. सिद्धनाथ भजन मंडळ व जयमल्हार भजन मंडळ ,वडी यांच्यासह कळंबी, लांडेवाडी, पळशी, त्रिमली व लाडेगाव येथील भजनी मंडळांकडून जागर करणेत येणार आहे. संपुर्ण सोहळ्यासाठी ह.भ.प. रिंकेश महाराज हे व्यासपीठ चालक तर ह.भ.प.मृदुंगमणी निलेश महाराज व गायनाचार्य ह.भ.प.संजय महाराज, रविंद्रमहाराज आळंदिकर हे आपली सेवा देणार आहेत.

 संपुर्ण सप्ताहामध्ये मानसिंग जगू मोहीते यांचेकडून चहापानाची व्यवस्था करणेत आली आहे. तरी ग्रामस्थांनी व पंचक्रोशीतील भाविकांनी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घेणेचे आवाहन पारायण कमिटी व सिद्धनाथ यात्रा कमिटी, वडी यांचेकडून करण्यात आले आहे. रविवार दि.२० रोजी किर्तनकार ह.भ.प. श्रीमंत महाराज यांचे काल्याचे किर्तन होणार आहे त्यानंतर दिंडी सोहळ्याने सप्ताहाची सांगता होईल. सोमवार दि.२१ रोजी ग्रामदैवत श्री सिद्धनाथाची पालखीतून मिरवणूक छबिना निघणार आहे. मंगळवार दि.२२ रोजी संगीताची राणी कराडकर यांचा बहारदार नृत्य, गायन, वादनकलेचा रंग-ढंग सोबतीचा सुरेल असा तमाशाचा कार्यक्रम सादर होणार आहे. दि. २३ रोजी रात्रौ ठिक ९ वा. कोल्हापूरचा धमाकेदार ऑर्केस्ट्रा सप्तसूर खास महीला वर्गासाठी विशेष पर्वणी ठरणार आहे. या व्यतिरिक्त कार्यक्रमातील बदल यात्रा कमीटीकडून अपरीहार्य कारणास्तव ठरवले अथवा ऐनवेळी केले जातील. पंचक्रोशीतील भाविकांनी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घेणेचे आवाहन सिद्धनाथ यात्रा समितीच्या वतीने अध्यक्ष श्री. विजय बाळासाहेब जाधव यांनी केले आहे.

लोकवर्गणीतून मंदिराचे रंगकाम करण्याच्या विचाराने प्रेरित होऊन तरुण मंडळाने यामध्ये हेरिरीने सहभाग घेऊन मंदिराचे व गावातील मारुती व मरीआई मंदिराचे रंगकाम कमी कालावधीत उत्कृष्टरित्या पार पडले आहे यामुळे ग्रामस्थांमध्ये उत्साह निर्माण झाला असून यात्रा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त