शिखर शिंगणापूरमधील आमरण उपोषण अखेर स्थगित!

दहिवडी : शेतकऱ्यांना ‘गाळमुक्त धरण,गाळयुक्त शिवार’ या संदर्भात शेतकऱ्यांना मोफत गाळ देण्याचा शासन निर्णय असतानाही शिंगणापूर ग्रामपंचायत प्रशासन शेतकऱ्यांना वेटीस धरून 200 रुपये प्रतिब्रास शेतकऱ्यांकडून ग्रामपंचायत आकारणी करत असून शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर प्रतिब्रास 100 रुपये आकारणी सुरू केली.परंतू शिंगणापूरचे सामाजिक कार्यकर्ते वीरभद्र कावडे, अतुल कर्चे, सुनील ठोंबरे,सोमनाथ काटकर,अनिल कर्चे यांनी सदर गाळ 50 रुपये प्रतिब्रास आकारणी करून शेतकऱ्यांना त्यांच्या शिवारात देण्यात यावा या मागणीसाठी गेल्या काही दिवसापूर्वी माण तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण केले होते. त्यावेळी गटविकास अधिकाऱ्यांनी गाळ स्थगित करण्याबाबतचे आदेश ग्रामपंचायत प्रशासनाला दिले होते.चैत्र यात्रा संपल्यानंतर शेतकऱ्यांना शेतात मोफत गाळ मिळावा यासाठी त्यांनी 16 एप्रिल रोजी पुन्हा उपोषण ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू केले होते.

 त्यावर ग्रामपंचायत प्रशासनाने चर्चा करून उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी माण पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी चंद्रकांत खाडे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा करून मध्यस्थी करून शेतकऱ्यांना सकस आहारातील गाळ प्रतिब्रास 60 रुपये प्रमाणे देण्यात येईल असे घोषित केले. दरम्यान उपोषणकर्त्यांनी परस्पर चर्चा करून तसेच मनाचा मोठेपणा दाखवून प्रतिब्रास 60 रुपये प्रमाणे आकारणी करण्याचे मान्य केले.शिंगणापूर ग्रामपंचायतच्या सरपंच सौ.अनघा दिपक बडवे यांच्या हस्ते लेखी स्वरुपात पत्र घेऊन उपोषण स्थगित करण्यात आले. 

 शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याबद्दल उपोषणकर्ते वीरभद्र कावडे यांच्यासह सहकार्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाचे आभार मानले.दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना वीरभद्र कावडे म्हणाले की, शेतकऱ्यांना मोफत गाळ देण्यासंदर्भात शासन निर्णय असतानाही तसेच शेतकऱ्यांचा विरोध असतानाही ग्रामपंचायत प्रशासन प्रतिब्रास 100 रुपये आकारणी करत होते.माण तालुक्यात उन्हाची तीव्रता बिकट असून शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी आहेत. या अडचणीतही शेतकऱ्यांकडून प्रतिप्रास शंभर रुपये आकारणी सुरू होती. शेतकऱ्यावर अन्याय होत असल्याने माझ्यासह सहकाऱ्यांनी प्रतिब्रास 50 रुपये आकारणी करावी या मागणीसाठी आमरण उपोषण केले.अखेर दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायत प्रशासनाने प्रभारी गटविकास अधिकारी चंद्रकांत खाडे यांच्या मध्यस्थीने 60 रुपये प्रतिब्रास आकारणी केल्याने उपोषण स्थगित केले आहे.

 यावेळी राजाराम बोराटे, ग्रामपंचायत अधिकारी दौंड, पोलीस पाटील संतोष बोराटे, डॉ.अतुल बंदुके,सचिन बोराटे उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त