श्रीपतराव पाटील हायस्कूलचा यश निकम सुवर्णपदकाचा मानकरी

सातारा : करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव पाटील हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी व सातारा जिल्ह्याचा पहिला बॉक्सिंग खेळाडू यश भगवान निकम याची भारतीय बॉक्सिंग संघात निवड झाली आहे.

 यशने 30 ते 33 किलो वजन गटात महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत दिल्ली, हरियाणा व उत्तराखंडच्या खेळाडूंना पराभूत केले व देशात प्रथम क्रमांक मिळवून तो सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. त्याची वर्ल्ड बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 15 वर्षाखालील मुले या आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी भारतीय बॉक्सिंग संघात निवड झाली आहे.

 शिक्षण प्रसारक संस्थेचे विद्यमान सचिव श्री तुषार पाटील यांची त्याला मिळणारी प्रेरणा, संस्थेकडून होणारे कौतुक व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक श्री सागर जगताप यांचे लाभलेले मार्गदर्शन यामुळे हे सुवर्णपदक तो मिळवू शकला. शिक्षण प्रसारक संस्थेच्या अध्यक्षा वत्सला डुबल, उपाध्यक्ष जगन्नाथ किर्दत, नंदकिशोर जगताप, सचिव तुषार पाटील, चेअर पर्सन प्रतिभा चव्हाण, संस्थेचे सर्व संस्थाचालक, शिक्षक, पालक व गावकरी यांनी यश व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त