आर्मी इंटिलिजन्सचा वडले (फलटण) येथील ॲकॅडमीवर छापा
सैन्य भरती करतो म्हणून विद्यार्थ्यांची फसवणूक, फलटण ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल
मंगेश कुंभार - Tue 11th Oct 2022 05:13 am
- बातमी शेयर करा
फलटण : आर्मी मध्ये नोकरीला लावतो म्हणून कोरेगाव तालुक्यातील एकाला फलटण तालुक्यामधील एकाने व माण तालुक्यातील एकाने फसवले असल्याबाबतचा गुन्हा फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आलेला आहे. यामध्ये आर्मी इंटिलिजन्सने वडले येथील ॲकेडमीवर छापा मारला असुन त्यांनी यामध्ये कसुन चौकशी केली आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेली माहिती अशी की, पोलीस भरतीसाठी व आर्मी भरतीसाठी कोडवलकर करिअर अॅकॅडमी, फलटण - शिंगणापुर रोड, वडले येथे अॅडमिशन घेणे करीता फिर्यादी सुनील त्र्यंबक पवार, रा. फडतरवाडी, पो. विखळे, ता. कोरेगाव गेले होते. त्यावेळी फिर्यादीचे 25 वय असल्याने व अॅकॅडमिमध्ये प्रवेश करणेसाठी वयाची अट 21 वर्षे असल्यामुळे अॅकॅडमीत घेत नव्हते. त्यावेळी अॅकॅडमीचे शिक्षक कोडवलकर, ताटे यांनी भेटुन अॅकॅडमीत अॅडमिशन घ्यायचे असेल तर तुझे वय कमी करावे लागेल नाही, आम्हाला वय कमी करून लावण्यासाठी तीन लाख रुपये द्यावे लागतील. नोकरी लागेल या आशेने दि. १२ मे २०२२ रोजी कोलवडकर यांना चाळीस हजार ऑनलाईन तर दि. १६ मे २०२२ रोजी ताटे यांना दोन लाख ६० हजार रूपये रोख दिले.
त्यानंतर वय कमी करायचे नाही व आर्मी मध्ये भरती व्हायचे नाही म्हणुन कोललडकर व ताटे यांच्याशी फिर्यादी यांनी संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावेळी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक बातम्या
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Tue 11th Oct 2022 05:13 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Tue 11th Oct 2022 05:13 am
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Tue 11th Oct 2022 05:13 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Tue 11th Oct 2022 05:13 am
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Tue 11th Oct 2022 05:13 am
संबंधित बातम्या
-
फलटण येथे छत्रपती संभाजी महाराज यांची इंस्टाग्राम वरची पोस्ट डिलीट करण्यासाठी आजीम आतार याची शिवीगाळ व धमकी
- Tue 11th Oct 2022 05:13 am
-
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Tue 11th Oct 2022 05:13 am
-
वाठार (निंबाळकर) येथील रवींद्र खोपडे यांचा खाजगी सावकारांच्या त्रासाने संसार उध्वस्त.
- Tue 11th Oct 2022 05:13 am
-
तपासणी थांबवतो’ म्हणत दोन लाखाची लाच मागितली… ACB ने कोरेगावच्या पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्याचा केला गेम ओव्हर!
- Tue 11th Oct 2022 05:13 am
-
शिक्षकाने केला विद्यार्थिनीला अश्लील मेसेज
- Tue 11th Oct 2022 05:13 am
-
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Tue 11th Oct 2022 05:13 am
-
पोक्सो तील आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व रु ५००००/- दंडाची शिक्षा.
- Tue 11th Oct 2022 05:13 am
-
उंब्रजमध्ये दिवसाढवळ्या चोरी
- Tue 11th Oct 2022 05:13 am











