तपासणी थांबवतो’ म्हणत दोन लाखाची लाच मागितली… ACB ने कोरेगावच्या पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्याचा केला गेम ओव्हर!

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई

सातारा :  सातारा जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्यास रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आनंद कैलास शिंदे, पुरवठा निरीक्षण अधिकारी, तहसील कार्यालय कोरेगाव यांनी एका तक्रारदाराकडून २ लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदार हा भारत गॅस एजन्सीचा व्यावसायिक असून, त्याच्या एजन्सीच्या गोडाऊनची वारंवार तपासणी टाळण्यासाठी व तक्रारदार यांच्या गॅस एजन्सीवर असलेल्या तक्रारी वर कारवाई न करण्यासाठी ही लाच मागण्यात आल्याचे समोर आले आहे. ही कारवाई टाळण्यासाठी 31 मार्च रोजी 25000 दिले होते उरलेल्या रकमेसाठी लोकसेवक आनंद शिंदे मागणी करत होते त्यामुळे तक्रारदार यांनी एक एप्रिल रोजी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा येथे तक्रार दाखल केली. त्यानुसार ४ एप्रिल रोजी पडताळणी करण्यात आली असता आरोपीने १ लाख २५ हजार रुपयांवर तडजोड केल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर ६ एप्रिल रोजी सापळा रचण्यात आला. या सापळ्यात आरोपी यांचा साथीदार अवधूत दिलीप कालेकर याने तक्रारदाराकडून १ लाख २५ हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.

ही कारवाई कोरेगाव येथील जनता सहकारी बँक परिसरात करण्यात आली. दोन्ही आरोपींविरुद्ध कोरेगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या कारवाईमुळे जिल्ह्यातील शासकीय यंत्रणेत खळबळ उडाली असून, भ्रष्टाचाराविरोधात कठोर कारवाईचा संदेश देण्यात आला आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला