वाठार (निंबाळकर) येथील रवींद्र खोपडे यांचा खाजगी सावकारांच्या त्रासाने संसार उध्वस्त.
फायनान्स कंपनीच्या तगादा. आणि सावकारांच्या दमदाटीमुळे आत्महत्या.राजेन्द्न बोन्द्रे
- Fri 24th Apr 2026 11:58 am
- बातमी शेयर करा
फलटण. : फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर या गावचे रहिवासी असणारे ट्रान्सपोर्ट व्यवसायिक रवींद्र खोपडे यांनी सावकारांच्या कडून होत असणाऱ्या सततच्या दमबाजीमुळे आणि त्यांची पत्नी कोमल यांना वेळी यावेळी फोनवरून धमकी येत असल्यामुळे मानसिक त्रासाला कंटाळून रवी खोपडे यांनी आत्महत्या केली आहे. एका होतकरू तरुणाचा संसार उध्वस्त झाल्यामुळे वाठार निंबाळकर गावात शोककाळा पसरली आहे. या झालेल्या दुर्दैवी घटनेमुळे खोपड्यांचे नातेवाईक आणि ग्रामस्थ संतप्त झाले असून या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांना कठोर शासन व्हावे अशी मागणी करण्यात येत आहे.
रवींद्र लालासो खोपडे हे आपल्या दोन मुले आणि पत्नीसह वाठार निंबाळकर येथील स्वतःच्या शेतात राहत होते. अतिशय होतकरू आणि कष्टाळू म्हणून या युवकाची ओळख होती. शून्यातून आपला व्यवसाय उभा करून संघर्ष आणि जिद्द सांभाळून या युवकाने आपला व्यवसाय वृद्धिंगत केला होता. शांत मनमिळावू आणि संयमी स्वभाव अशी त्याची ओळख होती.
पण फलटण येथील एक खाजगी सावकार आणि फायनान्स कंपनीचे अधिकारी यांच्या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून चिठ्ठी लिहून आपले जीवन संपवले.
रवी खोपडे यांना त्यांच्याकडून घेतलेले वाहन खरेदीदार बँकेचे मॅनेजर सावकार फायनान्स कंपनीचे अधिकारी यांनी सतत मानसिक त्रास देऊन त्यांचे आर्थिक नुकसान करून त्यांना व त्यांच्या पत्नींना सतत त्रास देत होते.
सततच्या होत असणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून रवी खोपडे यांनी आपली पत्नी कोमल मुलगी कुमारी कादंबरी वय वर्ष 13 मुलगा आदर्श वय वर्ष 11 यांनाही या गोष्टीचा होत असणारा मानसिक त्रास पाहून शेवटी आत्महत्येचे पाऊल उचलले आहे.
या दुर्दैवी घटनेनंतर रवी खोपडे यांच्या पत्नी सौ .कोमल रवींद्र खोपडे यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात सहा जणांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत,(0211/2026) गुन्हा नोंदवला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने पुढील प्रमाणे सहा संशयित आरोपींच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
1. सुरज हिंदुराव कदम. रविवार पेठ फलटण
2. दिगंबर भिवरकर शंकर नगर चिंचवड पुणे.
3 प्रितेश चोपडा पूर्ण पत्ता माहीत नाही.
4 कृष्णा उर्फ रमेशचंद्र केशवदेव गुप्ता ,हुजूर भोपाळ मध्य प्रदेश.
5 चोलामंडल फायनान्स चे मॅनेजर कोरडे राहणार फलटण पूर्ण नाव माहित नाही.
6 एका बँकेचे मॅनेजर स्वप्निल बालगुडे राहणार फलटण.
यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल तक्रार नोंदवण्यात आली आहे.
फिर्यादी यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरज हिंदुराव कदम यांनी रवींद्र खोपडे यांना पाच लाख रुपये दहा टक्के व्याजाने दिले होते त्यापैकी तीन लाख 50 हजार रुपये परत करून सुद्धा पैशासाठी आणखी तगादा लावून रात्री अपरात्री या पती-पत्नींना मोबाईल फोनवरून धमकी देऊन मानसिक त्रास देत होता. तसेच एका कंटेनरचा ताबा सुद्धा त्याने नोटरी करून रवींद्र खोपडे यांच्याकडून घेतला होता. खोपडे कुटुंब या सततच्या मानसिक त्रासाला आणि बदनामीला तसेच होत असणाऱ्या आर्थिक पिळवणुकीमुळे त्रस्त झाले होते.
यामुळे नैराश्य येऊन रवींद्र खोपडे यांनी चिठ्ठी लिहून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली अशी कुटुंबीयांनी माहिती दिली आहे.
संशयीत आरोपी दिगंबर हिवरकर आणि प्रितेश चोपडा यांनी 21 लाख 50 हजार ला दोन गाड्या खरेदी करून त्यावर असणारे 17 लाख पंच्याऐंशी हजार चे कर्ज पण न भरता तसेच उर्वरित रक्कम ही न देता फसवणूक केल्यामुळे त्यांची आर्थिक पिळवणूक आणि फसवणूक करण्यात आली असे फिर्यादी यांनी सांगितले आहे.
तर संशयित आरोपी कृष्णा गुप्ता याने 14 लाखांमध्ये एक गाडी खरेदी करून फक्त साडेतीन लाख रुपये रवींद्र खोपडे यांना दिले व बाकीचे पैसे देण्यास टाळाटाळ करून वरून दमदाटीची भाषा करण्यात येऊ लागली होती.
दुसरे संशयीत आरोपी चोलामंडल फायनान्स चे श्री कोरडे यांनी रविंद्र खोपडे यांच्या गाड्या उभ्या करून त्यांना व्यवसाय करून देता मानसिक त्रास व दमदाटी केल्यामुळे रवींद्र खोपडे हे मानसिक तणावात होते. संशयित आरोपी एका बँकेचे मॅनेजर स्वप्निल बालगुडे यांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता खोपडे यांच्या इतर शेजाऱ्यांना तसेच नातेवाईकांना फोन करून शिवीगाळ व धमकी देत होते.
वरील आरोपींच्या या बदनामीकारक कृत्याने तसेच मानसिक त्रासाने आणि आर्थिक फसवणूक झाल्याने रवींद्र खोपडे आणि कुटुंबीय बरेच दिवस मानसिक तणावाखाली होते. या मानसिक त्रासाचे बदनामीचे आणि तणावाचे रूपांतर शेवटी रवींद्र खोपडे यांच्या आत्महत्येस कारणीभूत झाले आहे.
वाठार निंबाळकर येथील ग्रामस्थांनी याबाबत संतप्त भावना व्यक्त केल्या असून एक होतकरू तरुण उद्योजकाला आर्थिक कचाट्यात अडकवून त्याची मानहानी करून व बदनामी करून आत्महत्येस प्रवृत्त केल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करत आहेत तर असा अवैध खाजगी व्यवसाय राजरोसपणे कायद्याने बंधनकारक असून सुद्धा होत असून अशा व्यवसायाला कोणाचे पाठबळ आहे आणि असा व्यवसाय करण्यास कोणी आर्थिक पाठबळ तर देत नाही ना? का या खाजगी सावकारी स्पर्धेत मुख्य सूत्रधार कोण आहे याबाबत पोलीस प्रशासनाने चौकशी करावीआणि पाठबळ देत असल्यास आर्थिक पाठबळ देणाऱ्यांच्या विरुद्ध सुद्धा पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी वाठार निंबाळकर गावातून आणि नातेवाईकांच्या कडून होत आहे शासनाने नवीन कायदे करून खाजगी सावकारीला प्रतिबंध आणि आळा बसावा यासाठी पाऊल उचलले आहे, परंतु पोलीस प्रशासनाकडून जर कठोर कारवाई झाली नाही तर कायद्याचा धाक उरत नसल्यामुळे अशा घटना घडत असल्याचे सर्वसामान्य नागरिकांच्या चर्चेतून आढळून येत आहे. इथून पुढे तरी खाजगी सावकारांच्या मुळे संसार उध्वस्त होऊ नये म्हणून प्रशासनाने कठोर पावले उचलावीत अशी रास्त आणि योग्य मागणी खोपडे कुटुंबीय आणि ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.
स्थानिक बातम्या
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Fri 24th Apr 2026 11:58 am
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Fri 24th Apr 2026 11:58 am
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Fri 24th Apr 2026 11:58 am
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Fri 24th Apr 2026 11:58 am
नो रिअल ....हो! अगदी खरं आहे. रील च्या चक्कर मध्ये आपण रिअल राहिलो नाही.
- Fri 24th Apr 2026 11:58 am
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Fri 24th Apr 2026 11:58 am
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Fri 24th Apr 2026 11:58 am
-
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Fri 24th Apr 2026 11:58 am
-
सातारा पोलिसांची धडक कारवाई; सुमारे १९ लाखांचा बेकायदेशीर स्फोटकसाठा जप्त
- Fri 24th Apr 2026 11:58 am
-
गुणवरेचा गांजा उत्पादक शेतकरी अंकुश कोळेकर ला फलटण ग्रामीण पोलिसांनी गांजा सह घेतले ताब्यात.
- Fri 24th Apr 2026 11:58 am
-
पुसेगाव पोलिसांची मोठी कारवाई; खटाव जवळील मळवी शिवारात हातभट्टीवर छापा, १ लाख १ हजारांचा मुद्देमाल जप्त!
- Fri 24th Apr 2026 11:58 am
-
स्थानिक गुन्हे शाखा व वडूज पोलिसांची धडाकेबाज कारवाई; 17.09 लाखांचा बेकायदेशीर स्फोटकसाठा जप्त
- Fri 24th Apr 2026 11:58 am
-
चैन स्नॅचिंग करणारे सराईत गुन्हेगार यांना ढेबेवाडी पोलीस यांनी केली अटक
- Fri 24th Apr 2026 11:58 am













