पोक्सो तील आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व रु ५००००/- दंडाची शिक्षा.
आशपाक बागवान.
- Mon 23rd Feb 2026 09:07 pm
- बातमी शेयर करा
औंध : औंध पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर ११२ / २०१९ भा.दं.वि.सं कलम ३७६(१)(एन)(२), ४५२,३२३,५०६ Pocso Act ४,६नुसार आरोपी महेश वसंत गलांडे वय ३९ वर्षे, रा. नागाचे कुमठे, तालुका खटाव, जिल्हा सातारा याचे विरोधात पिडीत अल्पवयीन युवतीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्यास अनुसरून प्रथम खबरी अहवालातील माहिती नुसार दिनांक २३/१२/२०१८ रोजी च्या दुपारी १२:००वा.चे दरम्यान व त्यानंतर दिनांक १५/०१/ २०१९ रोजी पर्यंत वेळोवेळी नागाचे कुमठे येथील फिर्यादीचे राहते घरी नागाचे कुमठे, तालुका खटाव, जिल्हा सातारा येथील आरोपी महेश वसंत गलांडे याने पिडीत फिर्यादीचा त्याचा मित्र याच्याबरोबर झालेले बोलणे रेकॉर्ड करून फिर्यादीच्या घरात घुसून रेकॉर्डिंग ची भीती घालून फिर्यादीकडे शरीर सुखाची मागणी केली. त्यास फिर्यादीने नकार दिल्यावर आरोपीने फिर्यादीस हाताने मारहाण केली व घरात तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. सदरची घटना कोणाला सांगितली तर तुझे रेकॉर्डिंग लोकांना दाखवीन असा दम देऊन फिर्यादी वर दिनांक 23/12/2018 ते दिनांक 15/01/2019 रोजी पर्यंत वारंवार बलात्कार केला असून यातील फिर्यादी ही आठ महिन्याची गरोदर असल्याबाबतचा खबरी जवाब दिल्यावरून गुन्हा रजिस्ट्री दाखल करण्यात आलेला आहे.
सदर गुन्ह्यात तत्कालीन मा.सहाय्यक पोलिस निरीक्षक, श्री.उत्तम एस. भापकर व दप्तरी पोलीस कॉन्स्टेबल, श्री.चंद्रकांत शिंदे,बक्कल नंबर २३७२ यांनी साक्षीदारांचे जाब-जबाब नोंदवून घेतले व या कामी सरकारी पक्षाच्या वतीने मा.जिल्हा सरकारी वकील अजित कदम-साबळे यांनी काम पाहिले. यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने एकुण १२ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांचे जाब-जबाब, कागदोपत्री व वैद्यकीय पुरावा आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून मा. अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश, वडूज, श्री.व्ही. बी. काकतकर यांनी आरोपीला बाल लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम कलम ६ अन्वये २० वर्ष सश्रम कारावास व ५००००/- हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद, तसेच ५००००/- हजारां पैकी २५०००/- रूपये पिडीतेस नुकसान भरपाई देणे असे आदेशित केले. भा.दं.वि.संहिता कलम ४५२ अन्वये २ वर्ष सश्रम कारावास व ५०००/- दंड व दंड न भरल्यास महिना साधी कैद, भा.द.वि.स कलम ५०४ अन्वये २ वर्ष सश्रम कारावास व ५०००/- दंड व दंड न भरल्यास १ महिना साधी कैद, भा.द.वि.स कलम ३२३ अन्वये १ वर्ष सश्रम कारावास व १०००/- दंड व दंड न भरल्यास ७ दिवस साधी कैद, वरील कलमान्वये मा.न्यायालयाने दोषी ठरवून दि.२३/०२/२०२६ रोजी आरोपी महेश वसंत गलांडे यास शिक्षा सुनावली.
सदर खटला चालवणे कामी मा.उपविभागीय पोलिस अधिकारी, दहिवडी कॅम्प वडूज, रणजीत सावंत, स.पो.नि. गणेश वाघमोडे, औंध पोलीस ठाणे यांनी मार्गदर्शन केले. तसेच प्रॉसिक्यूशन स्कॉड, पोलिस कॉन्स्टेबल श्री.जयवंत शिंदे(मेजर), बक्कल नंबर २४१४, औंध पोलीस स्टेशन तसेच पो.उपनिरिक्षक श्री.दत्तात्रय जाधव, महिला पोलीस हवालदार,श्रीमती. विजयालक्ष्मी दडस, बक्कल नंबर २०८६, पोलीस कॉन्स्टेबल, श्री.अमीर शिकलगार बक्कल नंबर २९२, पोलीस कॉन्स्टेबल, श्री.सागर सजगणे बक्कल नंबर ५८५ यांनी सहकार्य केले.
स्थानिक बातम्या
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Mon 23rd Feb 2026 09:07 pm
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Mon 23rd Feb 2026 09:07 pm
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Mon 23rd Feb 2026 09:07 pm
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Mon 23rd Feb 2026 09:07 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Mon 23rd Feb 2026 09:07 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Mon 23rd Feb 2026 09:07 pm
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Mon 23rd Feb 2026 09:07 pm
-
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Mon 23rd Feb 2026 09:07 pm
-
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Mon 23rd Feb 2026 09:07 pm
-
मुंबईत गुन्हा, जावळीत लपाछपी; बॉलिवूड दिग्दर्शक नुरानीचा ‘फार्महाऊस प्लॅन’ मेढा पोलिसांनी उधळला!
- Mon 23rd Feb 2026 09:07 pm
-
फलटण उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा एकदा खळबळ . (एका डॉक्टरची सुसाईड नोट वायरल.)
- Mon 23rd Feb 2026 09:07 pm
-
फलटण नगरपरिषदेत कर वसुलीतील कथित अपहार उघड; संगणक परीचारकास अटक
- Mon 23rd Feb 2026 09:07 pm
-
टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने 'थार' लांबवणारा भामटा जेरबंद
- Mon 23rd Feb 2026 09:07 pm
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Mon 23rd Feb 2026 09:07 pm











