वाई तालुक्याच्या जनतेने दिलेले प्रेम लाख मोलाचे श्री श्रीपाद जाधव

 वाई तालुक्यातील जनतेने दिलेले प्रेम, केलेले सहकार्य कधीच विसरने शक्य नसून ते ऋणानुबंध मनात कायम राहतील, असे कृतज्ञतापूर्वक उदगार सातारा जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव यांनी भुईंज येथे काढले.
    वाई सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उपअभियंता पदावरून सातारा जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता (उत्तर) या पदी बढती मिळाल्याबद्दल भुईंज येथे ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी भुईंज येथील महालक्ष्मी मंदिर, भृगुऋषि मठ ही ऊर्जा देणारी अलौकिक ठिकाणे असल्याचे सांगून हा ठेवा समृद्ध व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
उपसरपंच प्रशांत जाधवराव, ज्येष्ठ नागरिक वसंतराव भोसले पाटील, प्राचार्य आर. एस. पाटील यांच्या हस्ते मानाचा फेटा, शॉल, पुष्पहार, कंदी पेढे देऊन श्रीपाद जाधव यांचा सत्कार करन्यात आला.
यावेळी सोसायटीचे चेअरमन मदन शिंदे, संचालक जालिंदर भोसले, तिरंगा फाउंडेशनचे पै. जयवंत पवार, उत्कर्ष पतसंस्थेचे व्यवस्थापक प्रकाश पवार, जेष्ठ पत्रकार कृष्णात घाडगे, उद्योजक विजय चव्हाण, गणेश भोसले, अजित शिंदे, देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र भोसले, उमेश जाधवराव, विरसेन जाधवराव, पै. राहुल शिंदे, पै. प्रफुल्ल शिंदे, वाई तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विलास साळुंखे, राहुल तांबोळी, किशोर रोकडे, विनोद भोसले, जितेंद्र वारागडे, संजय माटे, अमित पाटील, एस. पी. पाटील, एन. बी. कोवाळे, आशुतोष जाधव आदी उपस्थित होते. जयवंत पिसाळ यांनी सर्वांचे स्वागत करून आभार मानले.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला