जागतिक स्तरावर रोटरी एक समाजसेवेचे मंदिर
बापू वाघ- Thu 2nd Feb 2023 04:39 pm
- बातमी शेयर करा
वाई : जागतिक स्तरावर रोटरी एक समाजसेवेचे मंदिर असून या मंदिराच्या माध्यमातून स्वयंस्फूर्तीने सुरू असलेले कार्य एखाद्या देवदूताप्रमाणे आहे , प्रत्येक रोटरी सदस्याने 'जगात आशेचे किरण निर्माण करा' हे ब्रीद उराशी बाळगून महात्मा गांधी यांचा 'साश्वत बदलाचा मंत्र' जोपासून स्वतःला झोकून दिले पाहिजे व त्या करिता कुटुंब प्रमुख म्हणून प्रत्येक प्रांतपालाची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन रोटरी इंटरनॅशनलचे २०२३ - २०२४ चे अध्यक्ष गॉर्डन मॅकेनली यांनी रोटरी इंटरनॅशनल च्या असेंम्बलीत केले असल्याची माहिती रोटरी विभाग ३१३२ च्या नियुक्त प्रांतपाल स्वाती हेरकळ यांनी दिली .
रोटरी इंटरनॅशनलच्या प्रथेनुसार जगभरात दरवर्षी रोटरीचे नेतृत्व बदलत असते व प्रत्येक रोटरी विभागाचा प्रमुख म्हणून प्रांतपाल असतो . एकूण ११ जिल्ह्यांचा व ९१ क्लबचा समावेश असलेल्या रोटरी विभाग ३१३२ च्या प्रांतपालपदाची २०२३- २४ ची धुरा वाई रोटरी क्लबच्या रोटेरियन स्वाती हेरकळ या सांभाळणार आहेत .रोटरी विभाग ३१३२ मध्ये स्वाती हेरकळ या प्रांतपालपदी विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला प्रांतपाल असल्याने सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवण्यात आला आहे . वर्षभर कसे नेतृत्व करायचे, जगातील अन्य रोटरी विभांगांची संस्कृती जाणून घेणे , दोनशे देशातून उपस्थित असलेल्या एकूण ५०० प्रांतपाल यांच्या समवेत मित्रत्वाचा सेतू अधिक दृढ करून त्यांच्याशी संवाद साधून , कार्याचे नेटवर्किंग व्हावे तसेच ग्लोबल ग्रांटच्या माध्यमातून इंटरनॅशनल पार्टनर शोधून आपल्या रोटरी विभागातील गरजूंच्या समस्यांचा निराकरण कसे करता येईल या अनुषंगाने आगामी वर्षभराच्या कार्याची आखणी करण्यासाठी
नवनिर्वाचित प्रांतपालांनी जुलै मध्ये सूत्रे घेण्यापूर्वी इंटरनॅशनल असेंम्बलीला उपस्थित राहणे अनिवार्य असते . नुकत्याच ऑरलॅंडो फ्लोरिडा ( अमेरीका) येथे पार पडलेल्या इंटरनॅशनल असेंम्बलीत प्रशिक्षण घेऊन स्वाती हेरकळ मायदेशी परतल्या आहेत .
या असेंम्बलीच्या माध्यमातून विविध देशाचे प्रांतपाल एकाच व्यासपीठावर उपस्थित राहून विचारांची , संस्कृतीची व राबवत असलेल्या प्रकल्पांची देवाण घेवाण करतात असल्याची माहिती देताना स्वाती हेरकळ म्हणाल्या , " रोटरी विश्वात भारताला मोठे आदराचे स्थान असून विभिन्नता , संस्कृती व महात्मा गांधी यांच्या विचारांना खूप मोठे महत्व दिले जाते , तसेच रोटरी फौंडेशनला देणगी देण्यात व सदस्य संख्येत भारताचे अग्रगण्य स्थान असल्याचा उल्लेख करण्यात आला . भारताच्या विविध राज्यातून उपस्थित असणाऱ्या ३१ प्रांतपालांनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रमांचे दर्शन, विविध देशातील प्रतिनिधींनी त्यांच्या देशातील अभिवादन करण्याच्या पद्धती व भारताच्या प्रत्येक राज्याची वेगवेगळी वेशभूषा जगभरातील उपस्थिनांना अधिक भावली . महात्मा गांधी यांचा समाजातील साश्वत व कायस्वरुपाचा बदल करण्याचा मंत्र दृष्टित ठेवून व पुढील वर्ष 'बदलाचे वर्ष' म्हणून काम करत 'आशेचे किरण निर्माण करा' हे ब्रीद उराशी बाळगून मानसिक ताण, जागतिक शांती व पोलिओ निर्मूलन या करिता प्रत्येक रोटरी क्लब ने झोकून या संस्थेची समाजसेवेची ११८ वर्षांची परंपरा जोपासली पाहिजे असा संदेश रोटरी इंटरनॅशनलच्या अध्यक्षांनी यावेळी दिला . वाई रोटरी क्लबने ग्लोबल ग्रँटच्या माध्यमातून हाती घेतलेल्या पाण्यापासून वंचित असलेल्या ओहोळी ( ता वाई ) येथे घरा - घरा पर्यंत पोहचलेल्या पाणीपुरवठा योजनेचे या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सादर केलेल्या 'सक्सेस स्टोरीचे' विशेष कौतुक झाले असल्याचे स्वाती हेरकळ यांनी सांगितले .
स्थानिक बातम्या
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Thu 2nd Feb 2023 04:39 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Thu 2nd Feb 2023 04:39 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Thu 2nd Feb 2023 04:39 pm
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Thu 2nd Feb 2023 04:39 pm
म्हसवड नगरपरिषदेत सूर्यवंशी दाम्पत्य ठरले ’धुरंदर’!
- Thu 2nd Feb 2023 04:39 pm
सातारा नगरपरिषद निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
- Thu 2nd Feb 2023 04:39 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 2nd Feb 2023 04:39 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 2nd Feb 2023 04:39 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Thu 2nd Feb 2023 04:39 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Thu 2nd Feb 2023 04:39 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Thu 2nd Feb 2023 04:39 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Thu 2nd Feb 2023 04:39 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Thu 2nd Feb 2023 04:39 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Thu 2nd Feb 2023 04:39 pm













