माण तालुका फोटोग्राफर असो.तालुकाध्यक्ष पदी प्रफुल्ल कांबळे तर उपाध्यक्ष पदी शिवदास कुलकर्णी

गोंदवले बु. ता. माण येथे  माण तालुका फोटोग्राफर असोसिएशन यांची वार्षिक बैठक घेण्यात आली. या बैठकीत नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. तालुकाध्यक्ष म्हणून प्रफुल कांबळे (रानंद), उपाध्यक्ष शिवप्रसाद कुलकर्णी (वावरहिरे), सचिव धनंजय कावडे (शिंगणापूर), खजिनदार गणेश शिंदे (बिजवडी) व  संस्थापकीय अध्यक्ष म्हणून नेताजी कट्टे यांची सर्वानुमते निवड करण्यात निवड आली.
 बैठकीच्या प्रारंभी  कोरोनामध्ये निधन झालेले ज्येष्ठ फोटोग्राफर महेश स्वामी, दत्तात्रेय काशीद, आणि अपघातामध्ये निधन झालेले तुषार खाडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी तालुक्यातील 55 फोटोग्राफर उपस्थित होते , यावेळी मान तालुक्या फोटोग्राफर असोसिएशनचे नवीन पदाधिकाऱ्यांची सर्वांमते खेळीमेळीच्या च्या वातावरणात निवड झाली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा  सत्कार दहिवडी फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष अजित जाधव, खजिनदार शिवाजीराव जगदाळे पत्रकार दौलत नाईक, संदीप जठार, फिरोज तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आला.ही संघटना स्थापन झाली तिला आज दहा वर्षे पूर्ण झाली. गेली दहा वर्षापासून  संघटनेचे अध्यक्षपद नेताजी कट्टे यांनी यशस्वीपणे सांभाळले,ते गोंदवले बु।चे सुपुत्र असून गोंदवले परीसरात हाडाचे फोटोग्राफर म्हणून ओळख आहे.यावेळी संघटनेमध्ये नवीन सदस्य सामावून घेणे, फोटोग्राफरसाठी वर्कशॉप घेणे, नवीन कार्यक्रम घेणे मिटींग आयोजित करणे संघटनेचे ओळखपत्र देणे, नवीन दरपत्रक बनविणे या संदर्भात  चर्चा झाली आहे. यावेळी  फोटोग्राफर तुळशीराम यादव , राजू मुळे, प्रवीण माने, निशांत बोराटे, समर्थ स्वामी, प्रकाश शिंगटे, भाऊ शेलार, अतुल गायकवाड आदी उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला