यशासाठी विद्यार्थ्यांनी खडतर परिश्रमाची तयारी ठेवली पाहिजे.बी. एन. पवार सहसचिव (माध्य) रयत शिक्षण संस्था सातारा
Satara News Team
- Tue 6th Feb 2024 02:41 pm
- बातमी शेयर करा
ढेबेवाडी : येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये जलशुद्धीकरण यंत्र अटल टिंकरिंग लॅब व दहावी बारावी विद्यार्थ्यांचा शुभचिंतन कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी बोलताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रयत शिक्षण संस्थेचे माध्यमिक विभागाचे सहसचिव बी. एन. पवार म्हणाले, रयत शिक्षण संस्था विविध उपक्रम राबवत आहे. विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थांच्या माध्यमातून देबेवाडी विद्यालयाची गुणवत्ता वाढविण्यासाठी आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू. आजच्या काळात ज्यांच्याकडे विविध कौशल्य आहेत त्यालाच येथून पुढच्या स्पर्धेच्या युगात टिकता येणार आहे. शालेय जीवनापासून आपण वाचन, मनन,चिंतन ही कौशल्य विकसित केली पाहिजेत. शाळेतील शिकवण आपल्याला आयुष्यभर उपयोगी पडते. वाचनाने माणूस आशावादी राहतो आणि ज्ञानाने समृद्ध होतो. वाचनाने विद्यार्थ्यांची मानसिकता कणखर राहते. विद्यार्थी दशेत जबाबदारीचे भान ठेवून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला यशाची दारे आपोआप उघडतात, म्हणून यशासाठी विद्यार्थ्यांनी खडतर परिश्रमाची तयारी ठेवली पाहिजे.यावेळी त्यांच्या हस्ते जलशुद्धीकरण यंत्र व अटलटिंकरिंग लॅबचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी श्रुती ढेब, नेहा पाटील, अमर जानुगडे, प्रसाद जानुगडे यांनी मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी स्त्री शक्ती फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार अन्यन्या पांढरपट्टे या विद्यार्थिनीस मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी श्री नाईकबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विलासरावजी जानुगडे (आप्पा) तसेच माजी प्राचार्य गणपतराव कणसे, विलासराव जाधव, कुमार कचरे, सरपंच रूपाली पाटील, अश्विनी मोहिते, अनिल जानुगडे, संदीप जानुगडे, सुनील जानुगडे, नारायण जाधव, दिलीप पांढरपट्टे, भरत जानुगडे, दादासो माने तसेच शिक्षक वृंद विद्यार्थी- विद्यार्थिनी बहुसंख्येने हजर होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य एम. एस. पाटील यांनी केले. तर सूत्रसंचालन सौ रोहिणी जाधव व प्रा. सौ मानसी क्षीरसागर यांनी केले. आभार प्रा. दादाराम साळुंखे यांनी मानले.
स्थानिक बातम्या
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Tue 6th Feb 2024 02:41 pm
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Tue 6th Feb 2024 02:41 pm
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Tue 6th Feb 2024 02:41 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Tue 6th Feb 2024 02:41 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Tue 6th Feb 2024 02:41 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 6th Feb 2024 02:41 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 6th Feb 2024 02:41 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Tue 6th Feb 2024 02:41 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Tue 6th Feb 2024 02:41 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Tue 6th Feb 2024 02:41 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Tue 6th Feb 2024 02:41 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Tue 6th Feb 2024 02:41 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Tue 6th Feb 2024 02:41 pm













