आ. शिवेंद्रसिंहराजेंमुळे अस्वलाच्या हल्ल्यातील जखमींना मिळाली मदत

सातारा : सातारा तालुक्यातील झुंगटी आणि केळवली येथील दोन ग्रामस्थ अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झाले होते. आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे या दोन्ही जखमी ग्रामस्थांना वन विभागाकडून प्रत्येकी ५ लाख रुपये आर्थिक मदत मिळाली आहे. 

झुंगटी येथील संतोष लक्ष्मण कोकरे वय ४२ आणि केळवली येथील शंकर दादू जानकर वय ५३ हे दोघे दि. २५ नोव्हेंबर २०२३ रोजी झुंगटी येथून कारगावकडे चालत निघाले होते. रस्त्यात दुपारी १ च्या सुमारास एका अस्वलाने त्या दोघांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले होते. आ. शिवेंद्रसिंहराजेंनी या दोघांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी वन विभागाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे या दोघांनाही वन विभागाकडून प्रत्येकी ५ लाख रुपये मदत मिळाली. 

मदतीचा धनादेश आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या हस्ते या दोघांना सुपूर्त करण्यात आला. यावेळी साताराचे वन क्षेत्रपाल निवृत्ती चव्हाण, रोहोटचे वनपाल राजाराम काशीद, वनरक्षक सुनील शेलार, अंकुश कोकरे, सुरेश माने, रामचंद्र अवकीरकर, बाबुराव कोकरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास

रचना प्रॉपर्टी एक्‍स्‍पो 2024चे शानदार उद्घाटन संपन्न.... विविध मान्‍यवरांची उपस्‍थिती

रचना प्रॉपर्टी एक्‍स्‍पो 2024चे शानदार उद्घाटन संपन्न.... विविध मान्‍यवरांची उपस्‍थिती

शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

उद्या पुसेगाव बैलगाडी शर्यती धावणार 1199 बैलगाड्या   शर्यतीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाईन लॉट्स पाडले जाणार

उद्या पुसेगाव बैलगाडी शर्यती धावणार 1199 बैलगाड्या शर्यतीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाईन लॉट्स पाडले जाणार

कोळकी ग्रामपंचायत मध्ये राजे गटाला दुसऱ्यांदा खिंडार.

कोळकी ग्रामपंचायत मध्ये राजे गटाला दुसऱ्यांदा खिंडार.

'श्रीपतराव पाटील हायस्कूल' व 'आदर्श विद्यामंदिर'च्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार

'श्रीपतराव पाटील हायस्कूल' व 'आदर्श विद्यामंदिर'च्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त