सपोनी. अक्षय सोनवणे यांचा अवैध धंदेवाल्यांना चाप....

दहिवडी बाजारपेठेतील ताडी विक्रेत्या विरोधात गुन्हा दाखल.

आंधळी; दहिवडी पोलीस स्टेशनचे सपोनी.सोनवणे यांनी आपला कारभार  हाती घेतल्यापासून दहिवडी परिसरातील दारू,मटका,जुगार यासारखे अवैध धंदे करणाऱ्या विरोधात कारवाईचा धडाका सुरू केला असून अनेक अवैध धंदे, करणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काल रात्री दहिवडी बाजारपेठेमध्ये ताडी दारू विक्री करणाऱ्या वर अचानक धाड टाकत गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत हकीकत अशी की,दहिवडी बाजारपेठेतील मायणी चौकाजवळ सागर हॉटेल च्या बोळात भिंतीच्या पाठीमागे उघड्यावर ताडी व देशी दारू विकताना श्रीकांत देवा गौंड रा. बालाजी नगर, दहिवडी याला रंगे हात पकडत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाई मध्ये 7225 रु. मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हि कारवाई सपोनी. अक्षय सोनवणे, पो. ना. प्रमोद कदम, पो. कॉ. केतन बर्गे, पोलीस कॉ. अमर पाटोळे, पोलीस कॉ.गणेश पवार, महिला पो. ना. गौरी ढगे यांनी केली असून अधिक तपास महिला पो. खाडे करत आहेत. 

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला