माण तालुक्याच्या समृद्धी मोरेचा राज्यात डंका


 माण  : क्रीडा व युवक सेवा संचालन महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद भंडारा, जिल्हा क्रीडा अधिकारी भंडारा,भंडारा जिल्हा 
आष्टे डु आखाडा असोसिएशन   यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आलेल्या  शिवकालीन मर्दानी खेळ राज्यस्तरीय शालेय अष्टे डु स्पर्धा 2023 -24 
अष्टे डू मर्दानी आखाडा स्पर्धा तुमसर येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेई क्रीडा संकुल तुमसर येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये सातारा ,सांगली, कोल्हापूर , रायगड, वासिम , भंडारा, पुणे, बीड, औरंगाबाद सह या   स्पर्धेसाठी  200ते300खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.  शिवकला   या खेळ प्रकारामध्ये दहिवडी येथील A1कराटे क्लबच्या   समृद्धी मोरे या विद्यार्थ्यांनी आपला जलवा दाखवत (गोल्ड मेडलची )कमाई केली.

समृद्धी मोरे हिचे राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थिनीला प्रशिक्षक राष्ट्रीय खेळाडू नवनाथ भिसे सर यांचे मार्गदर्शन लाभले.

अष्टे डू आखाडा असोसिएशनचे सातारा जिल्हा सचिव शिवाजी पवार, अष्टेडू चे जिल्हा सातारा उपाध्यक्ष बंडोपंत लोखंडे, खजिनदार नवनाथ भिसे,रोहित लिलेंगे श्रेयश लंगडे ,  या सर्वांनी स्पर्धकांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला