मलवडी येथे कुस्त्याचे चित्तथरारक मैदान.
हसन पटेल ठरला चांदीच्या गदेचा मानकरीविशाल गुरव
- Thu 8th Dec 2022 01:02 pm
- बातमी शेयर करा
आंधळी : मलवडी (ता. माण) येथे श्री. खंडोबा यात्रेनिमित्त झालेल्या कुस्ती आखाड्यात झालेल्या चित्तथरारक लढतींनी कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. प्रथम क्रमांकाच्या रोमहर्षक लढतीत पैलवान हसन पटेल याने पोकळ घिस्सा डावावर उपमहाराष्ट्र केसरी पैलवान योगेश पवार याच्यावर मात केली व तो एक लाख एक्कावन्न हजार रुपये व चांदीच्या गदेचा मानकरी ठरला.लक्षवेधी ठरलेल्या एक लाख रुपये इनामाच्या कुस्तीत पै. जयदीप गायकवाड याने पै. अनिल ब्राम्हण याच्यावर डंकी डावावर मात केली. पै.भावेश सावंत याने पै. पप्पू काळे याला उलटी डावावर धोबीपछाड देत पंच्याहत्तर रुपये इनामाची कुस्ती जिंकली. पै. महावीर बनसोडे विरुद्ध पै. विशाल राजगे ही एक्कावन्न हजार रुपये इनामाची कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. तर पै. अक्षय तुपे याने पै. गणेश पाटोळे याला मच्छी गोटा डावावर पराभूत करुन पंचवीस हजार इनाम जिंकले. मलवडीचा सुपुत्र असलेल्या पै. जय कुंभार याने पै. गौरव रुपनवर याला तर पै. ओंकार निंबाळकर याने पै. अभिषेक सोडमिसे याला हात काढून घिस्सा डावावर चितपट करुन कुस्ती शौकिनांची वाहवा मिळवली.किरण जगदाळे यांनी चांदीची गदा दिली तर बाबू सावंत, अशोक बोराटे, दशरथ बोराटे, दादासाहेब काळे, श्री मल्हारी म्हाळसाकांत देवस्थान ट्रस्ट मलवडी, अतुल जगदाळे, भालचंद्र देवकर, रामचंद्र जगदाळे यांनी इनामासाठी देणग्या दिल्या तर विजय जाधव यांनी चषक दिले. राजेंद्र जगदाळे व पै. अनिकेत कदम यांच्या बहारदार समालोचनाने आखाड्यास रंगत आली.पै. जय कुंभार यांचे वडील दिपक कुंभार यांनी मलवडीतील तरुणांच्या सहकार्याने भरवलेल्या या आखाड्यास पैलवानांसह कुस्ती शौकिनांचा उदंड प्रतिसाद लाभला.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Thu 8th Dec 2022 01:02 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Thu 8th Dec 2022 01:02 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Thu 8th Dec 2022 01:02 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Thu 8th Dec 2022 01:02 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Thu 8th Dec 2022 01:02 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Thu 8th Dec 2022 01:02 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 8th Dec 2022 01:02 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 8th Dec 2022 01:02 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Thu 8th Dec 2022 01:02 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Thu 8th Dec 2022 01:02 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Thu 8th Dec 2022 01:02 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Thu 8th Dec 2022 01:02 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Thu 8th Dec 2022 01:02 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Thu 8th Dec 2022 01:02 pm













