धोम धरणाच्या पाण्यात बुडून पिता पुत्राचा मृत्यू

वाई : धोम  धरणाच्या आसरे बोगदा कालव्याच्या पाण्यात बुडून पिता पुत्राचा मृत्यू झाला. आंबेदरा  आसरे (ता वाई)येथेही दुर्दैवी घटना घडली.उत्तम सहदेव ढवळे  व अभिजीत उत्तम ढवळे अशी त्यांची नावे आहेत.
 धोम धरणातून  भोर खंडाळा फलटण तालुक्याला बलकवडी धरणाच्या आसरे गावाजवळच्या बोगद्यातून कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येते. सध्या कालवा बंद आहे त्यामुळे येथे गेट टाकलेले आहे.त्यामुळे येथे पाणी साठलेले असते.या कालव्याच्या पाण्यात दुपारी  पोहण्यासाठी उत्तम सहदेव ढवळे (वय ४५) व अभिजीत उत्तम ढवळे (वय १३) हे दोघे  पितापुत्र गेले होते. यावेळी कालव्याच्या पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे दोघेही पाण्यात बुडाले.  लोकांनी आरडाओरडा केला. त्यांचा शोध घेतला मात्र ते मिळवून आले नाहीत. यानंतर महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम व वाई आपदा  ट्रेकर्स  टीमच्या सुनील भाटिया यांना कळविण्यात आले.  त्यांनी घटनास्थळी पाण्यात शोध मोहीम राबवली असता दोघांचेही मृतदेह सायंकाळी पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले. यावेळी या शोध मोहीमेतील सदस्य  अशुतोष शिंदे (वाई )यांच्या डोक्याला बोगद्यातील लोखंडी बार लागून ते जखमी झाले. त्यांच्यावर वाई ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सायंकाळी दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी वाई येथे आणण्यात आले होते. या घटनेची नोंद वाई पोलिस ठाण्यात झाली आहे. उत्तम ढवळे हे शेतकरीअसून त्यांचा चिकनचा व्यवसाय  होता. तसेच ते पट्टीचे पोहणारेही होते. त्यांच्या मागे पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे. या शोध मोहिमेत सुनील भाटिया अमित कोळी सचिन डोईफोडे सौरव साळेकर सौरभ गोळे आणि महेश बिरामने अजित जाधव आशिष बीरामने ऋषिकेश जाधव आशितोष शिंदे यांनी सहभाग घेतला.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त