साताऱ्यातील वाढलेला तीन टक्का कोणाला देणार धक्का

सातारा : १९९१ पासून आतापर्यंत लोकसभेसाठी आठ सार्वत्रिक निवडणुका झाल्या. यामध्ये सर्वात कमी मतदान २००९ च्या निवडणुकीत ५२.८ टक्के झाले होते, तर १९९९ च्या निवडणुकीत ७१.४१ टक्के मतदानाची नोंद झाली होती. २०१९ च्या निवडणुकीत ६०.४७, तर आता ६३. १६ टक्क्यांवर मतदान झाले आहे. हे वाढीव ३ टक्के मतदानच मतदारसंघाचा फैसला करणार आहे.

मतदान वाढीसाठी प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांना नागरिकांनी सहकार्य केल्याने सातारा लोकसभा मतदारसंघात मागील निवडणुकीपेक्षा सुमारे तीन टक्क्यांनी मतदान वाढले. त्यामुळे ६३. १६ टक्क्यांवर मतदान झाल्याने हा वाढता टक्का कोणाला धक्का  देणार या वर आता सातारकारांमध्ये चर्चा चालू आहे 

सातारा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली. सुमारे १९ लाख मतदार निवडणुकीसाठी पात्र होते. त्यातील ६३ टक्क्यांहून अधिक मतदारांनी आपला हक्क बजावला. तरीही अंतिम आकडेवारी आल्यानंतर मतदानाचा टक्का वाढण्याचा अंदाज आहे. त्यातच मागील निवडणुकीपेक्षा यंदा मतदानाचे प्रमाण वाढले आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांत जागृती केली. याचा परिणाम मतदान वाढीत झाला आहे. पण मतदानाची ही वाढती टक्केवारी काहींना डोकेदुखी ठरू शकते. याचे अनुमान आताच बांधणे अवघड असले तरी प्रमुख राजकीय पक्षांकडून विजयाचे दावे केले जात आहेत.

सातारा मतदारसंघात एकूण १६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यामध्ये विविध राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही नशीब अजमावले. तरीही खरी लढत ही भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांच्यातच झाली. या दोघांनी मतदारसंघात प्रचाराचे रान उठवले होते. तसेच या दोघांसाठी राष्ट्रीय तसेच राज्यस्तरावरील नेत्यांनी सभा घेऊन वातावरण निर्मिती केली होती. त्यामुळे मतदारसंघात चुरस निर्माण झालेली.

मतदान झाले असलेतरी मतमोजणीनंतरच वाढत्या मतदानाने कोणाला आधार दिला हे स्पष्ट होणार आहे. पण तोपर्यंत विचारमंथन होत राहणार आहे. तरीही संपूर्ण मतदारसंघात निवडणूक चुरशीची झाली. कऱ्हाड उत्तर, कऱ्हाड दक्षिण, वाई, कोरेगाव या विधानसभा मतदारसंघांत भाजप आणि राष्ट्रवादी उमेदवारांत मते मिळविण्यावरून रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे या निवडणुकीचा अंदाज बांधणे अवघड झाले आहे. यासाठी ४ जूनचीच वाट पाहावी लागणार आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला