वरिष्ठ महिला राज्य बॉक्सिंग स्पर्धेत सातारा जिल्हा तृतीय
महाराष्ट्र मिनी ऑलिंपिक स्पर्धेसाठी ७ खेळाडूंची निवडSatara News Team
- Mon 19th Dec 2022 03:07 pm
- बातमी शेयर करा
सातारा- नागपूर व अकोला येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत सातारा जिल्हा महिला संघाने १ सुवर्ण, २ रौप्य आणि २ कास्य पदके पटकावून तृतीय स्थान पटकाविले तर पुरुष गटात एका रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. दरम्यान, जानेवारी महिन्यात होणा-या महाराष्ट्र मिनि ऑलिंपिक स्पर्धेसाठी जिल्हयातील ७ खेळाडूंची निवड झाली आहे.
महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेतर्फे नागपूर येथे वरिष्ठ महिलांच्या राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत रिशिका होले हिने ५०-५२ किलो गटात सुवर्ण, यशश्री धनवडे हिने ४८-५० किलो व वेदांतीका पोतेकर हिने ७५-८० किलो वनज गटात रौप्य पदक तर मृणाल जाधव हिने ५४-५७ किलो व सोनिका सांगवान हिने ६० - ६३ किलो वनजगटात कास्यपदक पटकावून सातारा जिल्हा संघाला तृतीय स्थानावर पोहचविले. अकोला येथे झालेल्या वरिष्ठ पुरुष संघास मात्र १ रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. यात अशुतोष भारती याने ५१-५४ किलो गटात रौप्यपदक पटकाविले.
वरिल स्पर्धेतील कामगीरीवर जानेवारी महिन्यात होणा-या महाराष्ट्र मिनि ऑलिंपिक स्पर्धेत यशश्री धनवडे, गीता बासगी, रिशिका होले, सोनिका सांगवान, मृणाल जाधव, वेदांतीका पोतेकर व अशुतोष भारती या खेळाडूंची निवड झाली आहे. सर्व खेळाडूंचा व संघाचे प्रशिक्षक सागर जगताप यांचा जिल्हा बॉक्सिंग संघटनेतर्फे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी सत्कार करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी योगेश मुंदडा, मंगेश जाधव, रविंद्र होले उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Mon 19th Dec 2022 03:07 pm
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Mon 19th Dec 2022 03:07 pm
बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी
- Mon 19th Dec 2022 03:07 pm
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Mon 19th Dec 2022 03:07 pm
सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत
- Mon 19th Dec 2022 03:07 pm
संबंधित बातम्या
-
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Mon 19th Dec 2022 03:07 pm
-
न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात
- Mon 19th Dec 2022 03:07 pm
-
न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, करंजे पेठ येथील शौर्य विजय पवार याची विभाग स्तर बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
- Mon 19th Dec 2022 03:07 pm
-
न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, करंजे पेठ येथील शौर्य विजय पवार याची विभाग स्तर बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
- Mon 19th Dec 2022 03:07 pm
-
क्रीडा सप्ताहाचे सुरुवात जल्लोषात ....जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर
- Mon 19th Dec 2022 03:07 pm













