जिल्ह्याच्या तिसऱ्या डोळ्याचा राज्यात नावलौकिक अन् जिल्ह्यातील आरोपी सापडेनात....

संबंधित फरारी आरोपी एक पाऊल पुढे कि तिसऱ्या डोळ्याचे एक पाऊल मागे...?

   पुसेसावळी : पुसेसावळी येथे दिनांक १० सप्टेंबर २०२३ रोजी मशिदीत नमाज पठण करण्यासाठी गेलेल्या मुस्लिम समाजातील लोकांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यावेळी नुरूलहसन लियाकत शिकलगार याचा जागीच मृत्यू झाला. तर इतर १० जण गंभीर जखमी झाले.तसेच गावातील मुस्लिम समाजाच्या घरांवर हल्ला करण्यात आला. गाड्यांची जाळपोळ करण्यात आली.त्याबाबत औंध पोलीस ठाण्यात दिनांक ११ सप्टेंबर २०२३ रोजी  गुन्हा रजिस्टर नंबर २५५/२३ हा दाखल करण्यात आला . यातील काही आरोपीना अटक झाली तर काही आरोपी अद्याप फरार आहेत. जिल्ह्याचा तिसरा डोळा समजल्या जाणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेने परराज्यात पलायन करणाऱ्या तसेच उलघडा होण्याची किंचितही शक्यता नसणाऱ्या गुन्ह्यातील आरोपींना शिताफीने पकडून सातारा पोलीस दलाचे राज्यासह देशात नावलौकिक केल्याचा अभिमान वाटतो. परंतु गेली सहा महिने पुसेसावळी हत्याकांडातील फरार आरोपी सापडेनात ही संशयास्पद बाब आहे.

            या विभागाला पोलिस विभागात मोठे महत्त्व आहे. ही शाखा मुख्य गुन्हेगारी चौकशी आणि अत्यंत संवेदनशील गुन्हेगारी शोधात गुंतलेली आहे. या विभागाची "विश्वसनीय सुत्रे" जिल्ह्याच्या गावागावांत आणि गल्लीबोळात कार्यरत असल्या बरोबरच कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारीच्या शोधांना सामोरे जाण्यासाठी एलसीबीचा कर्मचारी अत्यंत हुशार असल्याने ही शाखा मोठ्या महत्त्वाच्या गुन्ह्यात पोलिस ठाण्यांच्या समांतर परंतु बारकाव्यांसह हटके तपास करते. म्हणूनच या शाखेला तिसरा डोळा म्हंटले जाते. परंतु  पुसेसावळी घटनेतील ३०२ कलमाखाली खुनाच्या आरोपात सामील असणारे मुख्य आरोपी अजून देखील फरार आहेत. जिल्ह्याच्या याच तिसऱ्या डोळ्याला आरोपी गेली सहा महिने सापडत नाहीत. त्यांना अटक करण्यासाठी प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही? कि फरारी आरोपी तिसऱ्या डोळ्याला धुरी देण्याइतपत शातीर आहे? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

            स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी यांनी मा. न्यायालयाकडे फरारी १४ आरोपींविरूद्ध अजामीनपात्र वॉरंट करिता दाखल केलेल्या प्रस्तावाला मंजूरी मिळाल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर संबंधित फरारी आरोपींपैकी कित्येकजण अनेकदा पुसेसावळी येथे आप्तेष्टांच्या भेटीला आल्याची चर्चा सुरू आहे. परंतु स्थानिक गुन्हे शाखेकडून संबंधित आरोपी शरणागती पत्करण्याची आशा बाळगून असल्याचेच चित्र निर्माण झाले आहे. संबंधित आरोपींना कोणत्यातरी "घायल मधल्या कथीत बलवंतराय" च्या दबावाखाली तिसरा डोळा 'डोळेझाक' करावा लागत आहे का हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जर तिसरा डोळा जाणून बुजून अथवा दबावाखाली डोळेझाक करीत असेल तर सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारीला आधार मिळून जोमाने वाढ झाल्यास यास त्या कथीत "बलवंतराय" पेक्षा पिडीतांना न्याय आणि अन्याय करणाऱ्यांना शासन देण्यासाठी निष्पक्ष काम करण्यासोबतच "सदरक्षणाय खलनिग्रहणाय" ची शपथ घेणारे कर्तव्यदक्ष पोलिस प्रशासनच सर्वस्वी जबाबदार असेल यात शंका नाही.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त