विडणी गावात ग्रामपंचायत निवडणूक मतदान शांततेत पार
Satara News Team
- Mon 19th Dec 2022 11:20 am
- बातमी शेयर करा
फलटण : फलटण तालुक्यातील २४ ग्रामपंचतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी रविवार दिनांक १८ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता शांततेत मतदानास प्रारंभ झाला.विडणी या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. या निवडणुकी साठी ६ मतदान केंद्रांवर मतदान पार पडले. सुमारे ७९.६०टक्के मतदारांनी हक्क बजावला आहे.थेट सरपंच पदासाठी भाजप वतीने सागर कांतीलाल अभंग,राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने सुरेश विठ्ठल नाळे,तर आप च्या वतीने अनिकेत किसन नाळे,तर अपक्ष म्हणून विठ्ठल सोनबा पवार हे उमेदवार थेट सरपंच पदासाठी उभे राहिले होते.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की फलटण तालुक्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे गाव असलेल्या विनंती गावात एकुण ६ वार्ड आहेत.निवडणुक करिता वार्ड क्रमांक १,४,५,६ मध्ये भाजप व राष्ट्रवादीचे आमनेसामने ३-३ उमेदवार निवडून लढवत होते.तर वार्ड क्रमांक २ मध्ये भाजप चे ३ राष्ट्रवादीचे ३ तर राष्ट्रीय काँग्रेस चा १ असे उमेदवार होते.तर वार्ड क्रमांक ३ मध्ये भाजपचे २ व २ राष्ट्रवादीचे असे चार उमेदवार आमनेसामने उभे राहिले होते.मतदानानंतर १ सरपंच पदासाठीच्या ४ तर १७ ग्रामपंचायत सदस्य पदासाठीच्या १८ उमेदवारांचे भविष्य ईव्हीएम मशीन मध्ये बंदीस्त झाले आहे .या सर्व निवडणूक प्रक्रियेवर उपविभागीय अधिकारी फलटण, उपविभागीय पोलिस अधिकारी फलटण तहसीलदार फलटण,राजाळे मंडलाधिकारी, ग्रामपंचायत विडणी तलाठी,ग्रामसेवक, व पोलीस पाटील यांच्या मार्गदर्शना खाली मतदान प्रक्रिया सर्वत्र व्यवस्थित पार पाडण्यासाठी व्यवस्था केली होती तर कायदा सुव्यवस्था बिघडू नये या करीता उपविभागीय पोलिस अधिकारी व फलटण शहर व फलटण ग्रामीण पोलिसांचे विशेष पथक मतदान स्थळी तैनात करण्यात आले होते.
विडणी गावात झालेले वार्ड निहाय मतदान पुढील प्रमाणे
वार्ड क्रमांक:१-१३२९
वार्ड क्रमांक:२-१००८
वार्ड क्रमांक:३-०७४८
वार्ड क्रमांक:४-१२३२
वार्ड क्रमांक:५-१४५८
वार्ड क्रमांक:-६-९०१
असे एकूण ८३८६ पैकी६६७६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
स्थानिक बातम्या
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Mon 19th Dec 2022 11:20 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Mon 19th Dec 2022 11:20 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Mon 19th Dec 2022 11:20 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Mon 19th Dec 2022 11:20 am
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Mon 19th Dec 2022 11:20 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Mon 19th Dec 2022 11:20 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Mon 19th Dec 2022 11:20 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Mon 19th Dec 2022 11:20 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Mon 19th Dec 2022 11:20 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Mon 19th Dec 2022 11:20 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Mon 19th Dec 2022 11:20 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Mon 19th Dec 2022 11:20 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Mon 19th Dec 2022 11:20 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Mon 19th Dec 2022 11:20 am













