उरमोडी नदीतून युवक गेला वाहून,

The youth was carried away by the river Urmodi,
एक युवक वाहून गेला. मनोज सुधाकर गडकरी (वय-२८, रा. नागठाणे ता. सातारा) असे वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे.

नागठाणे : सातारा तालुक्यातील नागठाणे येथील उरमोडी नदीतून एक युवक वाहून गेला. मनोज सुधाकर गडकरी (वय-२८, रा. नागठाणे ता. सातारा) असे वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, काल, रविवारी सायंकाळच्या सुमारास नागठाणे येथील तीन युवक उरमोडी नदी पात्रात पोहण्यासाठी आले होते. त्यातील दोघांनी नदी पात्रात उडी घेतली. परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे त्यातील एक जण वाहून गेला. सुदैवाने एक युवक बचावला.घटनेची माहिती मिळताच बोरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करत शोध मोहिम सुरु केली. मात्र, अद्याप वाहून गेलेल्या युवकाचा शोध लागला नाही. याघटनेबाबत नागठाणे पोलिसात फिर्याद दाखल झाली नाही. मात्र, बोरगाव पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला