मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाला माण बीडीओंचा कोलदांडा
Satara News Team
- Fri 23rd Sep 2022 07:12 am
- बातमी शेयर करा

माण : माण तालुक्यातील हस्तनपूर येथील वैभव जयसिंग किसवे हे दि १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले होते. जिल्हाधिकारी यांनी तातडीने दखल घेतली असून सातारा जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या दालनात दि १७ ऑगस्ट रोजी मुख्यकार्यकारी अधिकारी साहेब , माण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांचे समवेत उपोषणकर्ते वैभव किसवे यांची बैठक झाली होती. या बैठकीत बीडीओंना १५ दिवसांच्या आत सर्व कागदपत्रांची पडताळणी करून तक्रारदार यांना न्याय देण्याचे व संबंधित दोषींवर कडक कारवाई करण्याचे सांगण्यात आले होते. अद्याप माण चे गटविकास अधिकारी यांनी कोणतीही कारवाई केली नाही. गटविकास अधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाला कोलदांडा दाखवला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की हस्तनपूर ता. माण येथील वैभव किसवे हे राहत असलेल्या घरासमोरील मोकळी जागा पिढ्यानपिढ्या वहिवाट करत आहेत. किसवे कुटुंब यांच्या कडून ग्रामपंचायत ग्रामसेवक यांना वारंवार लेखी , प्रत्यक्ष भेटून , तोंडी सांगून जागा नोंद करून कर आकारणी करण्यास विनंती केलेली असता . अद्याप जागेची नोंद केली नाही. याबाबत वेळोवेळी लेखी पाठपुरावा केला आहे. सदर जागेत दि. ३ मार्च रोजी स्थानिक ग्रामस्थांनी किसवे यांचे साहित्य जबरदस्तीने इतरत्र विस्कटून टाकून नुकसान केले आहे. त्याचबरोबर त्यांनी किसवे कुटुंबातील सदस्यांना शिवीगाळ करून व धमकावून त्या जागेचा ताबा घेतला असून जीव मारण्याची धमकी दिली आहे. अशी तक्रारही शिंगणापूर पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली आहे. वारंवार मागणी करूनही या जागेची नोंद झाली नाही सध्या येथील स्थानिक ग्रामस्थांकडून किसवे कुटुंबाला वावरताना त्रास होत आहे. या संदर्भात वैभव किसवे हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले होते. जिल्हाधिकारी साहेब यांनी तातडीने दखल घेतली होती. मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी मार्फत माणचे गटविकास अधिकारी यांना १५ दिवसांच्या आत सर्व कागदपत्रांची पडताळणी करून वैभव किसवे यांना न्याय देण्याचे व संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी असा आदेश देण्यात आला होता. एक महिना झाला तरी अद्याप गटविकास अधिकारी यांनी कोणतीच कारवाई केली नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. अशी मागणी वैभव किसवे यांनी पुन्हा मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे. माणचे गटविकास अधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाला कोलदांडा घातल्याचा आरोप लेखी तक्रारीत वैभव किसवे यांनी केला आहे. याबाबतीत किसवे यांनी ८ सप्टेंबर रोजी लेखी तक्रार दिली आहे . तरीही बीडीओं यांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचे किसवे यांचे म्हणणे आहे.
#maan
स्थानिक बातम्या
कारागृहातून सुटलेल्या संशयिताला नेताना जमावाची गुंडागर्दी
- Fri 23rd Sep 2022 07:12 am
अवैध गुटखा विकणारांवर छापासत्र उंब्रज पोलीस, अन्न, औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई
- Fri 23rd Sep 2022 07:12 am
संजीवराजेंच्या घरी आयकर विभागाचे पथक; चौकशी चालू
- Fri 23rd Sep 2022 07:12 am
ऑनलाईन गेम मध्ये पैसे हरल्याने मोटर सायकल चोरी करणारा वडूज पोलीसांकडून जेरबंद.
- Fri 23rd Sep 2022 07:12 am
"असे" पालकमंत्री मिळणे सातारा जिल्ह्यासाठी दुर्दैवी..
- Fri 23rd Sep 2022 07:12 am
समाजातील लोकांनी दातृत्वाची भावना ठेवायला हवी : दत्तात्रेय इंगवले
- Fri 23rd Sep 2022 07:12 am
संबंधित बातम्या
-
"असे" पालकमंत्री मिळणे सातारा जिल्ह्यासाठी दुर्दैवी..
- Fri 23rd Sep 2022 07:12 am
-
तापोळा मंडलात शासन आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत वारस फेरफार अदालत आयोजित
- Fri 23rd Sep 2022 07:12 am
-
समाजातील लोकांनी दातृत्वाची भावना ठेवायला हवी : दत्तात्रेय इंगवले
- Fri 23rd Sep 2022 07:12 am
-
महाबळेश्वर रस्त्यालगतची केबल खोदाईत झाडे असुरक्षित
- Fri 23rd Sep 2022 07:12 am
-
पाचगणीत मूलभूत सुविधा कोमात; मात्र अत्याधुनिक सुविधा जोमात
- Fri 23rd Sep 2022 07:12 am
-
पुसेसावळी संपूर्ण शहर सीसीटीव्ही कक्षेत, प्रक्षेपण थेट पोलिस अधिक्षकांकडे असून फायदा काय?
- Fri 23rd Sep 2022 07:12 am
-
मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या आदेशाला पांचगणी मुख्याअधिकारी निखील जाधव यांच्याकडुन वाटाण्याच्या अक्षता
- Fri 23rd Sep 2022 07:12 am