सातारा जिल्हा क्रीडा संकुल येथेल जलतरण तलाव वादाच्या भोवऱ्यात आणी शंकास्पद कारभार ?

सातारा जिल्हा क्रीडा संकुल येथेल जलतरण तलाव वादाच्या भोवऱ्यात आणी शंकास्पद कारभार ?

सातारा :  सातारा जिल्हा क्रीडा संकुल येथील जलतरण तलाव वादाच्या भोवऱ्यात आणि शंकास्पद कारभारात अडकण्याची शक्यता आहे. पुण्यातील AK ग्रुपकडून लाखो रुपयांचं टेंडर राजकीय वरदहस्ताने मिळवले आणि आपली मनमानी सुरू केली. जिल्हा अधिकाऱ्यांची कोणतीही परवानगी न घेता पोहण्याची मासिक,त्रैमासिक,सहामाही आणि वार्षिक फी मध्ये वाढ करून सातारकर नागरिकांची अक्षरशः लूट सुरू केलीये. 1500 रुपये महिना दर निश्चित असताना 2200 रुपये दर कोणालाही कल्पना न देता AK ग्रुप ने मनमानी करून वाढवल्याने सातारकर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख गणेश अहिवळे यांनी या संपूर्ण टेंडर पद्धतीची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.कोव्हिड काळात गेली 3 ते 4 वर्ष पोहण्याचा तलाव डागडुजीसाठी बंद होता. क्रीडा संकुल प्रशासनाने लाखो रुपये खर्चून त्याची डागडुजी केली आणि सातारकर नागरिकांना आणि जलतरणपटू यांना पोहण्यासाठी तलाव खुला केला. सातारा शहरात सैनिक स्कुल,फुटका तलाव,शानभाग या सारखे मोजकेच तलाव उपलब्ध आहे.

जलतरणपटूंना सरावासाठी शाहू स्टेडियम या ठिकाणी जावे लागते,हा तलाव 50 मीटर लांबीचा आहे तर त्याच्या नजीक असलेला डायविंगचा खोल तलाव हा बंद ठेवण्यात आलेला आहे. तेथे पाणी साचल्याने त्यावर डासआळ्या तयार होऊन डेंग्यू,मलेरिया सारख्या रोगाचा प्रसार होण्याची भीती आहे. 50 मीटर चा तलाव हा एकमेव तलाव असून तो आठवड्यातून एकदा म्हणजे दर सोमवारी डागडुजीच्या नावाखाली बंद ठेवण्यात येतो. मात्र तरीही तेथील पाणी हे खराब होत असल्याने अनेक लहान मुले,वृद्ध आजारी पडले आहेत. पाणी फिल्टर करण्याची सुविधा असूनदेखील पाणी खराब होत आहे त्यामुळे तिथे पोहण्यासाठी आणि शिकण्यासाठी आलेल्यांना त्वचेचे संसर्ग होत आहेत.

तलाव दुरुस्त केल्यानंतर क्रीडा संकुल कार्यालयातील संगणकात मागील टेंडर प्रक्रियेच्या सर्व नोंदी होत्या मात्र त्या नोंदी अचानक गायब झाल्या असल्याची बाब समोर आल्याने मोठी खळबळ उडाली असून क्रीडा अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित केली जात आहे.सातारा जिल्ह्यात क्रीडा संकुल एकमेव असून या संकुल मध्ये मागील आठवड्यात क्रिकेटचे सामने भरवण्यात आले होते, त्यानंतर पावसामुळे हे मैदान भिजल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले होते. खाजगी आयोजकांनी सामने सुरळीत पार पाडण्यासाठी क्रिकेटच्या मैदानाची पार वाट लावली आहे. या मैदानावर खडी टाकून त्यावरती काळी मातीचे ढीग केले आहेत त्यामुळे या मैदानावर शेती करायची आहे का डांबरीकरण करायचं आहे? हे समजत नाही. येथे पोलीस भरतीचा सराव करण्यासाठी पहाटेपासून तरुणांची गर्दी असते. डांबरी रस्त्यावर धावल्याने गुडघेदुखीचा त्रास आणि अपघाताच्या भीतीने स्टेडियमच्या मैदानाला तरुण पैसे भरून सराव करतात मात्र मैदानावर खडी टाकून मैदानाची अक्षरशः वाट लावली आहे.मैदानावरील ठराविक ठिकाणची स्वच्छता केली जाते तर अनेक ठिकाणी कोपऱ्यात कचऱ्याचे ढीग लागले असून मोठी दुर्गंधी पसरत आहे. स्वतःच्या आरोग्यासाठी जेष्ठ नागरिक,लहान मुले ,खेळाडू येथे येतात मात्र येथील अस्वच्छतेने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी सातारा क्लब प्रमाणे या क्रीडा संकुलाकडे जातीने लक्ष घालून या ठिकाणी सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा तलाव मत्स्यव्यवसायासाठी देण्यात यावा अशी आगळीवेगळी मागणी गणेश आहिवळे यांनी केली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त