विद्यार्थ्यांसाठी ‘आरटीई’ प्रवेशाचे आदेश आले; मात्र अंमलबजावणी करण्यास शाळांचा अनुत्साह

प्रसंगी कठोर आंदोलन करणार : सरदार (सागर) भोगांवकर यांचा शाळांना इशारा

सातारा : आरटीई’ प्रवेशाच्या नियमातील दुरूस्ती रद्द करून आता इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच प्रवेश मिळणार आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने त्यानुसार बदल करून प्रवेश प्रक्रिया राबविण्यासंदर्भातील आदेश शिक्षण संचालकांना दिले आहेत. मात्र, असे असताना शासकीय आदेश डावलण्याचे काम सातार्‍यातील काही शाळांमध्ये सुरु असून याविरोधात लोकशाही मार्गाने कठोर आंदोलन करण्याचा इशारा देवदूत फौंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष सरदार (सागर) भोगांवकर यांनी दिला आहे.
सुधारित आदेशानुसार ‘आरटीई’ प्रवेशाच्या पोर्टलमध्ये बदल करावा लागणार आहे. शिक्षण खात्याने ‘एनआयसी’ला तशा सूचना केल्या आहेत. त्यामुळे नवीन आदेशानुसार ‘आरटीई’ प्रवेशाला सुरवात होणार आहे. यामुळे नवीन बदलानुसार म्हणजेच पूर्वीप्रमाणे आता पालकांना त्यांच्या घरापासून एक किमी अंतरावरील शाळा निवडता येणार आहे. इयत्ता पहिलीत प्रवेश मिळणार्‍या विद्यार्थ्यांचा आठवीपर्यंतचा खर्च शासनाकडून संबंधित शाळांना दिला जाणार आहे. मात्र, असे असताना सातारा शहरातील काही शाळा या आदेशाला कोलदांडा घालण्याचे काम करताना दिसत आहेत. अशा शाळांच्या विरोधात लोकशाही मार्गाने कठोर आंदोलन करणार असल्याचा तसेच प्रसंगी उपोषणही करण्याचा इशारा भोगांवकर यांनी दिला आहे.
शासनाने आरटीई’च्या नियमात बदल केल्यानंतर अर्ज भरण्यास सुरवात झाली होती. त्यानुसार आतापर्यंत राज्यातील दोन लाख 11 हजार पालकांनी अर्ज केले होते. त्यातील जवळपास 68 हजार पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश निश्चित केले होते. दुसरीकडे खासगी अनुदानित शाळांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना त्यांच्या एकूण प्रवेश क्षमतेतील 25 टक्के जागा रिक्त ठेवून ‘आरटीई’अंतर्गत प्रवेश देण्याचे आदेश दिले होते. पण, आता शासनाने पुन्हा नियमात बदल करून पूर्वीप्रमाणे प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.

शाळा-महाविद्यालयांची थकित शिष्यवृत्ती आणण्यासाठीही प्रयत्न करणार
शासनाकडे शाळा-महाविद्यालयांची लाखो रुपयांची शिष्यवृत्ती थकित आहे. शिष्यवृत्ती मिळाली नसल्याने शाळा-महाविद्यालयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत शाळा-महाविद्यालयांची थकित शिष्यवृत्ती आणण्यासाठीही पाठपुरावा करणार असल्याचे भोगांवकर यांनी सांगितले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला