महिला बचत गटांना पालिका सर्वतोपरी सहकार्य करणार : मुख्याधिकारी गिरीश दापकेकर

पांचगणी पालिकेच्या "सोनचिरैय्या" शहर उपजीविका कौशल्य केंद्राचे उद्घाटन

पांचगणी, : पर्यटन नगरी पाचगणी शहरातील बाजारपेठ अधिगृहीत करुन बचत गटांच्या महिलांनी आपल्या उत्पादित मालाचा ब्रँड बनवून उद्योगात उत्तुंग भरारी घेत आपल्या कुटुंबांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यात मोठी भूमिका बजवावी. यासाठी पालिका बचत गटांना सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन पांचगणी गिरिस्थान नगरपरिषदचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी केले.दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानंतर्गत शहरातील अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या योजनेतून पांचगणी नगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या सोनचिरैय्या शहर उपजीविका केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी दापकेकर बोलत होते. यावेळी कार्यालयीन निरीक्षक दिलीप रणदिवे , , बांधकाम अभियंता मुकुंद जोशी ,बांधकाम विभाग रवींद्र कांबळे कालिदास शेंडगे, जयंती गुजर, स्वच्छता विभाग प्रमुख सुरेश मडके, सहाय्यक प्रकल्प अधिकारी माधवी जगदाळे , सूर्यकांत कासूर्डे, सपना शेवाळे , बचत गटाच्या सुनीता कासूर्डे,  संजीवनी सोनवणे, सुनंदा गायकवाड शहर स्तर आणि वस्ती स्तर बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.समाजातील शेवटचा घटक हा कोणत्याही योजनेचा केंद्रबिंदू असला पाहिजे, असे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे म्हणणे होते. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दीनदयाळ उपाध्यय अंत्योदय योजना आखताना समाजाच्या शेवटच्या घटकाला शासनाच्या योजनांचा लाभ कसा मिळेल याचा अभ्यास करून ही योजना तयार करण्यात आली असून याचा फायदा वंचित घटकांना होणार आहे. असेही यावेळी दापकेकर यांनी सांगितलेदारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील महिला बचत गटांचे फेडरेशन तयार करून त्यांना व्यवसाय प्रशिक्षण पालिकेच्या वतीने देण्यात आले असून त्यातून उत्पादित होणाऱ्या मालाला पालिकेने बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. या योजनेतून शहरात राहणाऱ्या गरीब कुटुंबातील महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार तसेच स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, त्यांचे राहणीमान उंचावणे यासाठी पालिकेने ही योजना राबवली असल्याचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी माधवी जगदाळे यांनी सांगितले.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास

रचना प्रॉपर्टी एक्‍स्‍पो 2024चे शानदार उद्घाटन संपन्न.... विविध मान्‍यवरांची उपस्‍थिती

रचना प्रॉपर्टी एक्‍स्‍पो 2024चे शानदार उद्घाटन संपन्न.... विविध मान्‍यवरांची उपस्‍थिती

शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

उद्या पुसेगाव बैलगाडी शर्यती धावणार 1199 बैलगाड्या   शर्यतीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाईन लॉट्स पाडले जाणार

उद्या पुसेगाव बैलगाडी शर्यती धावणार 1199 बैलगाड्या शर्यतीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाईन लॉट्स पाडले जाणार

कोळकी ग्रामपंचायत मध्ये राजे गटाला दुसऱ्यांदा खिंडार.

कोळकी ग्रामपंचायत मध्ये राजे गटाला दुसऱ्यांदा खिंडार.

'श्रीपतराव पाटील हायस्कूल' व 'आदर्श विद्यामंदिर'च्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार

'श्रीपतराव पाटील हायस्कूल' व 'आदर्श विद्यामंदिर'च्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त