तळागाळातील जनतेसाठी छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेच्या विविध योजना
संस्थापक रामभाऊ लेंभे यांची माहितीSatara News Team
- Sun 30th Oct 2022 11:16 am
- बातमी शेयर करा
तरुणांचा सहभाग पतसंस्था व्यवहारात वाढावा, युवावर्ग पतसंस्थेकडे आकर्षित झाल्यास तो दीर्घकाळचा ग्राहक राहणार आहे यासाठी छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मोबाईल बँकींग सेवा व क्यूआरकोड सुविधा सुरू केलेली आहे. याशिवाय ही संस्था सर्वांना आपली वाटावी यासाठी सामाजिक बांधिलकीतून तळागाळातील जनतेसाठी कमी व्याजदराच्या विविध कर्ज योजना सुरू करण्यात आल्या आहेत अशी माहिती संस्थापक रामभाऊ लेंभे यांनी दिली.
पिंपोडे बुद्रुक ता.कोरेगाव येथील छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महिला स्वयंरोजगार कर्ज योजनेतून संस्थेने दोन महिन्यांत ६ कोटींचे वाटप केले असून २५ ते ४० वयोगटातील युवकांना मोबाईल, लँपटाँप खरेदीसाठी कर्जवाटप करण्यात येत आहे जेणेकरून पतसंस्थेमध्ये तरुण आला पाहिजे असे संस्थापक लेंभे यांनी सांगितले.
दारिद्र्यरेषेखालील महिलांसाठी कमी व्याजदरात सोने २ तोळेपर्यंत मनीमंगळसूत्र खरेदी योजना सुरू करण्यात येणार आहे.संस्था जशी मोठ्या कर्जदारांना कर्जवाटप करते तशी लहान कर्जदारांनाही प्राधान्य दिले जाते.छत्रपती संभाजी महाराज पतसंस्था दारोदार पोहोचविण्यासाठी मायक्रोफायनान्सद्वारे छोट्या छोट्या कर्जदारांना वाटप करून सामान्य माणसासाठी ही पतसंस्था कार्यरत आहे हे धोरण संस्थेने अवलंबले असून त्यास यश मिळत आले आहे असे सांगून संस्थापक लेंभे म्हणाले,संस्थेकडे ३० सप्टेंबरअखेर ठेवी ५३२ कोटी ८० लाख,कर्जवाटप ३७० कोटी २० लाख,भागभांडवल २५ कोटी ६४ लाख,गुंतवणूक १६२ कोटी ५३ लाख,खेळते भांडवल ६२२ कोटी ६७ लाख,संमिश्र व्यवसाय ९०३ कोटी अशी समाधानकारक आर्थिक स्थिती आहे. कोरोना संपताच संस्थेचे व्यवहार गतीमान झाल्याने ३१ मार्चनंतर सर्वच बाबींमध्ये वाढ झाली आहे.
------------------------------



स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Sun 30th Oct 2022 11:16 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Sun 30th Oct 2022 11:16 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sun 30th Oct 2022 11:16 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sun 30th Oct 2022 11:16 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sun 30th Oct 2022 11:16 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Sun 30th Oct 2022 11:16 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sun 30th Oct 2022 11:16 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sun 30th Oct 2022 11:16 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Sun 30th Oct 2022 11:16 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Sun 30th Oct 2022 11:16 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Sun 30th Oct 2022 11:16 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Sun 30th Oct 2022 11:16 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Sun 30th Oct 2022 11:16 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Sun 30th Oct 2022 11:16 am













