कास परिसरातील जमिनीवर अनधिकृत बांधकाम केल्यास संबंधितावर कारवाई करणार- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

सातारा :  सातारा जिल्हयातील कास पठार परिसरातील बांधकामाच्या अनुषंगाने राष्ट्रीय हरीत लवाद पश्चिम विभाग यांचेकडे दाखल असलेल्या मूळ अर्ज ३७/२०२३ चे अनुषंगाने न्यायालयाने दिनांक ४ डिसेंबर२०२३ रोजीच्या आदेशास अनुसरून जिल्हाधिकारी सातारा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग महाराष्ट्र राज्य, उपवनसंरक्षक सातारा, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांची समिती स्थापन करणेत आलेली असून सदर समिती सदस्य तसेच आवश्यक विभागाचे प्रमुख यांची आढावा बैठक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. कास परीसरातील जमीनधारकांनी कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम करू नयेत अन्यथा संबंधितांच्या विरूदध कारवाई करु, असे निर्देश  जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.
  बैठकीस महसूल विभाग, उपवनसंरक्षक, नगररचना विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी उपस्थित होते,  न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे समितीने सदरील जागी प्रत्यक्ष स्थळपाहणी करून   महाराष्ट्र नगररचना अधिनियम १९६६  यांमधील तरतूदींचे उल्लंघन झाले अगर कसे याची पाहणी करून अहवाल सादर करावयाचा असून या यानिमित्ताने १६ जानेवारी रोजी कास परीसराची समितीमार्फत पाहणी करण्यात येणार आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला