नवजात बाळालाही होऊ शकतो आय फ्लू, असे करा बाळाचे संरक्षण

सातारा न्यूज  : डोळ्यांच्या फ्लूचे रुग्ण सतत वाढत आहेत. अशा परिस्थितीत लोकांच्या मनात प्रश्न पडतो की डोळ्यांचा फ्लू हा फक्त प्रौढांना होतो की नवजात बालकांनाही होतो. या डोळ्याच्‍या फ्लूची समस्या नवजात मुलांमध्‍येही होऊ शकते. नवजात बालकांची प्रतिकारशक्ती इतकी विकसित नसते. अशा स्थितीत संसर्ग किंवा रोग त्यांना लवकर ग्रासतात. डोळ्याच्या फ्लूमुळे नवजात बालकांना ताप, खोकला, डोळे लाल होणे आणि डोळ्यात पाणी येणे अशी लक्षणे दिसू शकतात. उपचार न केल्यास नवजात बाळामध्ये डोळ्यांचा फ्लू गंभीर स्वरूप घेऊ शकतो. म्हणूनच हा संसर्ग टाळण्यासाठी डॉक्टर काही टिप्स आपण जाणून घेणार आहोत. 
 
नवजात बाळाला लसीकरण करा
 
नवजात शिशूमध्ये संसर्ग होण्याचा धोका कमी करण्यासाठी, जन्माच्या वेळी आवश्यक लस मिळवा. यामुळे बाळाच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होतील. फ्लूची लस 6 महिने वयाच्या बाळाला दिली जाऊ शकते. तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बाळाला फ्लूची लस लावू शकता. त्याचबरोबर घरात कुणाला आय फ्लू झाला असेल तर त्याने कमीत कमी 15 दिवस बाळाजवळ जावू नये आणि त्याला हातही लावू नये. बाळांची प्रतिकारशक्ती कमजोर असल्याने अशा आजारांना लहान मुलं त्वरीत बळी पडतात.

नवजात बाळाच्या आसपास स्वच्छता ठेवा
 
नवजात बाळाला डोळ्याच्या फ्लूपासून वाचवण्यासाठी स्वच्छतेकडे लक्ष द्या. आपले हात साबणाने आणि पाण्याने धुवा मगच बाळाला उचला. घाणेरड्या हातांमुळे बाळाला संसर्ग होऊ शकतो. खोकताना किंवा शिंकताना त्याच्या जवळ जाऊ नका. आय फ्लू हा एक वायुजन्य रोग आहे, तो हवेतून पसरतो. म्हणून मुलांच्या आचपासच्या सर्व वस्तू स्वच्छ ठेवा.
 
नवजात मुलांची खेळणी स्वच्छ ठेवा

स्वत:ला आणि तुमच्या बाळाला स्वच्छ ठेवण्यासोबतच तुम्हाला तुमच्या बाळाची खेळणी आणि तो वापरत असलेली प्रत्येक गोष्ट स्वच्छ ठेवली पाहिजे. लहान मुलांची खेळणी स्वच्छ ठेवण्यासाठी, त्यांना गरम पाण्यात उकळवा. याशिवाय, बाळाच्या खोलीत ताजी हवा आहे की नाही याची देखील खात्री करा. खोलीमध्ये खिडकी असेल तर त्याला नेट लावून ती ओपन ठेवा यामुळे मच्छर घरात येणार नाही आणि ताजी हवाही मिळेल.
 
बाळाला आजारी व्यक्तीपासून दूर ठेवा
 
तुमच्या घरात एखादा आजारी व्यक्ती असेल तर बाळाला त्याच्यापासून दूर ठेवा. नवजात बालकांची प्रतिकारशक्ती कमकुवत असल्यामुळे ते हंगामी आजारांना सहज बळी पडतात. तुम्हालाही सर्दी किंवा ताप असेल तर काही काळ बाळापासून दूर राहा. नवजात बाळाच्या बेडवरची चादर दररोज बदलली पाहिजे. तसेच, ज्या टॉवेलने तुम्ही बाळाची त्वचा रोज स्वच्छ करता तो रोज स्वच्छ करा. त्याचबरोबर बाळाचे कपडे उन्हात वाळवा आणि त्यांना रोज स्वच्छ कपडे घाला. ओले कपडे बाळांना घालू नका आणि घरी असल्यास हगीजचा वापर करणेही टाळा. बाळाला कॉटनचे कपडे घाला यामुळे त्यांच्या नाजूक त्वेचला त्रास होणार नाही.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत

सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला